शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

चार दिवसांपासून पडतोय वादळी पाऊस; पावसाने शेकडो एकर तयार भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 23:36 IST

नागोठणेत पिकांचे नुकसान, नागोठणे ते शेतपळस या रोहे तालुक्यातील भागात साधारणत: साडेचारशे ते पाचशे एकर शेतात भातशेती पिकविली जाते.

नागोठणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्या पार्श्वभूमीवर नागोठणे विभागात मागील चार दिवसांपासून वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतात तयार झालेली भातशेती भिजून गेली असल्याने, हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसान झालेल्या भातशेतीचा तातडीने पंचनामा करण्याचा आदेश दिला असल्याने आपल्या भातशेतीचा कधी पंचनामा होईल, याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे. 

नागोठणे ते शेतपळस या रोहे तालुक्यातील भागात साधारणत: साडेचारशे ते पाचशे एकर शेतात भातशेती पिकविली जाते. ऑक्टोबर महिन्यात पीक तयार झाल्यावर भातशेतीची कापणी करून भाताच्या लोंबी चार-आठ दिवस शेतातच आडव्या करून ठेवल्यानंतर ते बाहेर काढून शेतातच त्याची झोडणी करून भात व पेंढा वेगवेगळा  केला जातो. पंधरा दिवसांपासून भाताच्या कापणीला सुरुवात झाली असून, यातील दीडशे ते दोनशे एकर क्षेत्रात भात शेतकऱ्यांनी सुरक्षितपणे आपल्या घरीही नेऊन ठेवले आहे. मात्र, अजूनही अडीचशे ते तीनशे एकर जमिनीवरील काही भातशेतीची कापणी करून ते शेतातच पडून आहे, तर उर्वरित भाताचे पीक कापणी न झाल्याने शेतातच उभे आहे. संभाव्य वादळामुळे मागील चार दिवसांपासून येथे पाऊस पडत असल्यामुळे शेतात पावसाचे साचून राहिले असल्याने, हातात आलेले पीक भिजल्यामुळे हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेकडो टन भाताचे नुकसान होण्याची भीती आहे व जे भात उरेल, त्याचे दाणे काळे पडणार असल्याने त्याला किंमतही येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

काढणीला आलेले पीक भिजले

रोहा : चालू वर्षात एका पाठोपाठ एक आलेली संकटे, त्यातच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याचे पाहणे शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. ‘नको देवराया अंत आता पाहू’ अशी विनवणी शेतकरी करत आहेत,  तर माजी आमदार पंडित पाटील  यांनी ओला दुष्काळ जाहीर  करावा, अशी मागणी केली आहे.

गुढीपाडव्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने शेतीमालाला उठाव मिळाला नाही. लग्नसराई न झाल्याने, तसेच बाजारपेठा, हॉटेल बंद असल्याने, डाळी, कडधान्ये यासह फुले, भाजीपाला, नारळ यांना उठाव नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 

शहरात रोजगारासाठी गेलेली मंडळी रोजगार ठप्प झाल्याने गावी आल्याने, ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरी हिंमत न हारता शेतकऱ्याने खरिपाच्या पेरणीची तयारी केली, पण निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकणात बसला.येथील आंबा, काजू, नारळ, सुपारी पिकविणारा शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला. वाडवडिलांनी मोठ्या केलेल्या बागा नष्ट झाल्या. शासनाचे पाहणी दौरे झाले, तुटपुंजी मदत मिळाली. अजून अनेकांना ती मिळालेली नाही. उद्ध्वस्त घरे, शेती, बागा यांचे दु:ख सावरत कोकणात शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली. पर्जन्यमान मागील चार महिने बऱ्यापैकी असल्याने भाताचे पीक हाती येईल, अशी आशा होती, पण गेला आठवडाभर झालेल्या पावसामुळे भाताचे पीक मातीमोल झाले आहे. भाताचे पीक कापणे व त्याची मळणी करण्याचा खर्चदेखील निघणार नाही, अशी शेतक ऱ्यांची भयावह परिस्थिती आहे. 

टॅग्स :floodपूरFarmerशेतकरीRainपाऊस