शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

हापूसच्या संशोधनासाठी पुढाकार; कोकण कृषी विद्यापीठाचा वेंगुर्लेतील फळ संशोधन केंद्रात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:20 IST

आंतरराष्ट्रीय बाजारातील हापूस आंब्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासह फिलिपिन्स, पाकिस्तान आणि बांगलादेशचे राष्ट्रीय फळ म्हणूनही हापूसने प्रतिष्ठा मिळवली आहे.

- जयंत धुळप ।अलिबाग : आंतरराष्ट्रीय बाजारातील हापूस आंब्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासह फिलिपिन्स, पाकिस्तान आणि बांगलादेशचे राष्ट्रीय फळ म्हणूनही हापूसने प्रतिष्ठा मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर आंबा संशोधनास प्रोत्साहन देऊन, उत्पादनात जागतिक सहयोग आणि आंबा बागायतीचे ज्ञान हस्तांतरणाकरिता दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पुढाकारातून विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ८ ते १० मे २०१८ या कालावधीत जागतिक परिषदेचे आयोजन आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तापस भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील २० तज्ज्ञ सदस्यांच्या समितीच्या माध्यमातून या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेचे नियोजन करण्यात येत आहे. आंबा उत्पादन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असणाºया विद्यापीठाच्या सहा माजी कुलगुरूंसह अमेरिका, इस्रायल, थायलंड, आॅस्ट्रेलिया, यूकेमधील नामांकित मान्यवर शास्त्रज्ञांचा समावेश या समिती मध्ये आहे.आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील अनेक उष्णदेशीय देशांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. भारतात आंबा लागवडीखालील क्षेत्र दरवर्षी वाढते आहे. देशातील अनेक पिकांच्या तुलनेत, आंबा एक किफायतशीर संख्येत येणारे पीक आहे.कोकणातील आंबा बागायतीमधील सुधारणा आणि संशोधनाच्या प्रयत्नांमुळे आता हवामानातील बदलांचे दुष्परिणाम कमी करून उत्पादनवाढीस मदत केली आहे. आंबा उत्पादक देशांमध्ये हवामानातील बदलांमधील अनियंत्रित परिस्थितींचा सामना होत आहे आणि त्याचा प्रभाव विशेष करून फुलांच्या (मोहराच्या) शारीरिक अवकृपेत दिसून येतो. कीड आणि रोगाच्या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादक आणि संशोधकांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. या मुद्द्यांचा विचार ही परिषद आयोजित करण्यामागे आहे.पारंपरिक शेती पद्धतींच्या व्यतिरिक्त, छत व्यवस्थापन आणि उच्च घनतेचे वृक्षारोपण वाढीचे फायदे, आंबा उत्पादक शेतकºयांचे एकत्रीकरण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण या दृष्टीने मदत करण्याच्या उद्देशाने संरक्षित आंबा शेती, आंबा बाग सुयोग्य व्यवस्थापन आदींना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजना या परिषदेतून पुढे येणार आहेत. किनारपट्टीच्या भागात डोंगराळ भागांत आंबा बागेत ‘सीए’ पद्धतींचा वापर करून उत्पादनाचा खर्चही कमी करता येतो.शेतकºयांच्या आर्थिक स्तरवृद्धीस प्राधान्य देण्याकरिता फळबागांच्या संगोपनासाठी आणि फळे साठवण्यासाठी यांत्रिक यंत्रे, काढणी पश्चात आवश्यक प्रक्रिया, नॅनो-तंत्रज्ञानासह प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग, जागतिक बाजारपेठ पोहोचण्याकरिता आवश्यक सुयोग्य श्रृंखला यासंदर्भातील मार्गदर्शनउपलब्ध करून देऊन भारत सरकारच्या ‘दुप्पट शेतकरी उत्पन्न’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात आंबा उत्पादन आणि व्यापारवाढीचा वेग वाढविणारे ज्ञानयंत्र म्हणजे ही परिषद ठरेल, असा विश्वास विद्यापीठाचा आहे.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाकरिता, शेतकरी, उद्योग आणि संशोधन यामध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी’ या संस्थेचा सहयोग घेतला असून, परिषदेचे नऊ उद्देश निश्चित करण्यात आले आहेत.या नऊ उद्देशांमध्ये-जागतिक आंबा परिस्थिती-आंबा अनुवंशिकता आणि प्रजनन (पारंपरिक आणि अपारंपरिक मार्ग)-हवामानातील बदल-टिकाऊ उत्पादनासाठी कृषी-तंत्र (प्रसार : एकाग्र पोषण व सिंचन व्यवस्थापन; सेंद्रिय उत्पादन; संरक्षण शेती)-आंबा फार्म यांत्रीकीकरण (साधने व अवजारे; विनाविध्वंसक तंत्रज्ञान)-वनस्पती संरक्षण (एकात्मिक कीड, रोग व तण व्यवस्थापन)-उत्पादन पश्चात पीक व्यवस्थापन (हाताळणी; मूल्यवर्धन; पॅकेजिंग, कचरा आणि बाय-उत्पादने, नॅनो-टेक्नोलॉजी)-तंत्रज्ञान आणि उत्पादन अर्थशास्त्र हस्तांतरण (यशकथा; केस स्टडी, दुप्पट शेतकरी उत्पन्न) आणि निर्यात आणि व्यापारीकरण यांचा समावेश आहे.- जागतिक आंबा उत्पादनात भारताचे ४० टक्के पेक्षा अधिक योगदान होते. देशातील अनेक पिकांच्या तुलनेत, आंबा एक किफायतशीर संख्येत येणारे पीक आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून आंबा उत्पादकता वृद्धीकरिता भारतात मोठी संधी आहे.