शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ग्रीटिंग कार्डची वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:14 IST

गिफ्ट शॉपी गुलाबी आणि लाल वस्तूंनी सजलेली असताना, सोशल मीडियाच्या जमान्यातही ग्रीटिंग कार्ड आपले अस्तित्व टिकवून आहे.

अलिबाग : व्हॅलेंटाइन डे हा केवळ महाविद्यालयीन तरु ण आणि युवा पिढीपुरताच मर्यादित राहिला नाही. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठांनी आता व्हॅलेंटाइनचा आधार घेतला आहे. दुकानात दिसणाऱ्या विविधरंगी ग्रीटिंगपासून भेटवस्तूपर्यंत व्हॅलेंटाइन विशेष वस्तूंनी मध्यमवयीन नागरिक आणि अगदी आजी, आजोबांनाही भुरळ घातली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवयीन जोडपीही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी ग्रीटिंग कार्डचा आधार घेत आहेत.

गिफ्ट शॉपी गुलाबी आणि लाल वस्तूंनी सजलेली असताना, सोशल मीडियाच्या जमान्यातही ग्रीटिंग कार्ड आपले अस्तित्व टिकवून आहे. या ग्रीटिंगचे आकर्षण तरु ण पिढीपेक्षा मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक आहे, असे दुकानदारांकडून सांगितले जात आहे. युवा पिढी प्रपोज करण्यासाठी ग्रीटिंग कार्डचा अधिक वापर करते तर त्यापुढची पिढी प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी ग्रीटिंगचा आधार घेताना दिसत आहे.मोठ्या दुकानांमध्ये पर्सनलाइज्ड किचेनपासून टीशर्टपर्यंत तसेच फोटोफ्रेम यांची मागणी अधिक असते. अनेकदा मध्यमवयीन नागरिक आपल्या जोडीदारासाठी लहानसे गिफ्ट निवडून महाविद्यालयीन काळात न केलेल्या मजेचा आनंद घेतात.

युवा पिढी सातत्याने एकमेकांसाठी भेटवस्तूंची खरेदी करीत असली. तरी यानिमित्ताने हटके काही खरेदी करण्याकडे त्यांचा कल आहे.यंदा दुकानांमध्ये सोनेरी रंगाचे गुलाब खास व्हॅलेंटाइन डेला भेटवस्तू म्हणून दिसत आहेत. त्याशिवाय हृदयाच्या आकाराच्या मेणबत्त्याही हा सण अधिक संस्मरणीय करण्यासाठी विक्र ीला उपलब्ध आहेत.खºया गुलाबाची किंमत ८० रु पये डझनपासून पुढे आहे. यात लाल रंगाच्या गुलाबांची किंमत व्हॅलेंटाइनच्या दिवशी आणखी वाढेल, असेही विक्रे ते सांगतात. तर पिवळ्या आणि अबोली रंगाचे गुलाब १० रु पयांपर्यंत मिळत आहेत.व्हॅलेंटाइनसाठी बुके बनवणाºया दुकानांमध्येही वेगाने कामे सुरू आहेत. खास व्हॅलेंटाइनसाठी वेगळे बुके नसले तरी बुकेमध्ये लाल गुलाबांचा समावेश, हृदयाच्या आकाराचे बुके यांची मागणी अधिक होते, अशी माहिती बुके विक्रेत्यांनी दिली.