पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात 

By जमीर काझी | Updated: September 9, 2022 14:58 IST2022-09-09T14:55:26+5:302022-09-09T14:58:51+5:30

पेण मध्ये पतीने रागामध्ये पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची हत्या केली आहे.

In Pen, wife was killed by putting a gas cylinder on her head, husband arrested by police  | पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात 

पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात 

अलिबाग: गणेश उत्सवासाठी गावी आलेल्या दांपत्यामध्ये झालेल्या किरकोळ कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात गॅसचा सिलेंडर घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पेण तालुक्यातील चांदेपट्टीत गुरुवारी घडली. मृत महिलेचे सुवर्णा संजय दळवी ( वय ४०) असे नाव असून तिचा पती संजय तुकाराम दळवी याला पेण पोलिसांनीअटक केली आहे

कौटुंबिक वादातून कृत्य
ठाण्यात राहत असलेले दळवी दांपत्य दोन मुली व एक मुलीसह गणेशोत्सवनिमित्त पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावी आले होते. काही कारणास्तव गुरुवारी रात्री त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या संजयने रागाच्या भरात सुवर्णाच्या डोक्यात सिलेंडर मारुन जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या सुवर्णा व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या आरडाओरडयाने शेजारील कल्पेश ठाकूर महेश भिकावले तेथे आले. त्यांनी सुवर्णला पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. भांडणाचे कारण स्पष्ट झालेले नाही. संजय दळवी याला अटक करण्यात आले असून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व त्यांचे सहकारी करीत आहेत.


 

Web Title: In Pen, wife was killed by putting a gas cylinder on her head, husband arrested by police