शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

ईव्हीएमविरोधात कर्जतमध्ये घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:26 AM

निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरच्या आधारे घेण्याची मागणी

कर्जत : आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम मशिनचा वापर न करता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरच्या आधारे घ्यावी या प्रमुख मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारिप बहुजन महासंघाने कर्जत तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. त्यानंतर मागणीचे निवेदन त्यांनी तालुका प्रशासनाला दिले.तहसीलदार अविनाश कोष्टी यांची जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल गवळे, कर्जत तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, युवा अध्यक्ष प्रदीप ढोले, युवा सरचिटणीस राहुल गायकवाड, युवा नेते धर्मेंद्र मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे गुलाब शिंदे आदीनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.जगातील अनेक देशांनी ईव्हीएम मशिन नाकारली आहे म्हणून आगामी विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर करू नये, बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेतल्यास त्यावर मतदारांची विश्वासार्हता राहील असे निवेदनात नमूद केले आहे.आमच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधावे हाच आंदोलनाचा हेतू आहे, अशी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे तसेच शासनाने याबाबत लवकर भूमिका घेतली नाही तर पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ