शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बंदुकीच्या धाकावर हॉटेल लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:41 IST

एक लाखाची चोरी : चार तासांत तीन आरोपी अटकेत

पालघर/तलासरी/कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल ‘आकाश’च्या मालकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून १ लाख १० हजारांची रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या चार तासांत अटक करण्यात पालघर पोलिसांना यश मिळाले आहे. या कामी उत्कृष्ट कार्य करणाºया पोलिसांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितले.

कासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या धुंदलवाडीजवळील हॉटेल ‘आकाश’मध्ये बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास २० ते २२ वयोगटातील तीन तरुण जेवण करण्यास आले. जबरी चोरी करण्याचा डाव असल्याने जेवण करता करता त्यांनी हॉटेलमधील सर्व व्यवस्थेची पाहणी केली. जेवण आटोपल्यानंतर त्या तीन इसमांपैकी एकाने बाहेर जात आपली कार सुरू केली, तर हॉटेलमध्ये असलेल्या अन्य दोन तरुणांनी हॉटेलचे मालक नितेश यादव (३०) यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून त्यांच्याकडील १ लाख १० हजाराची रक्कम घेऊन पळून जाऊ लागले. या वेळी मालकाने आरडाओरड केल्याने हॉटेलमधील वेटर आणि शेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील चालक मदतीला धावले. दोन्ही आरोपी आपल्या उभ्या गाडीकडे धाव घेत असताना उपस्थितांनी कारचालकावर हल्ला चढवीत गाडीची चावी काढून घेतली. आपल्याला घेरण्यात आल्याचे लक्षात आल्यावर त्यातील एका आरोपीने आपल्या हातातील रिव्हॉल्वरमधून तीन राऊंड फायर केले. त्यामुळे काही काळासाठी उपस्थित सर्व लोक थोडे मागे हटले. ही संधी साधीत तीनही आरोपीनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, डहाणूचे मंदार धर्माधिकारी, बोईसरचे विश्वास वळवी यांच्या सहकार्याने १२० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टीम बनवून परिसरातील नाक्यांवर नाकाबंदी केली. घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम राबवीत पोलिसांनी आरोपींना अवघ्या चार तासांत पकडण्यात यश मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले.काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या ताब्यातघटनास्थळी दोन काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या आरोपींवर मध्य प्रदेशमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पुढील तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत.या प्रकरणाचा पुढील तपास कासा पोलीस ठाण्याच्या सिद्धवा जायभाये या करणार असून या प्रकरणी उत्कृष्ट तपास करणाºयांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड