'शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, युगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा'; उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी

By संतोष कनमुसे | Updated: April 12, 2025 14:06 IST2025-04-12T13:51:49+5:302025-04-12T14:06:16+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत.

Government should publish the history of Shivaji, make a non-bailable law regarding the greats Udayanraje bhosle demands from Amit Shah | 'शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, युगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा'; उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी

'शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, युगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा'; उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी

"छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. १० वर्ष बेल मिळाली नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकडून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, अशी मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासमोर केली. छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. यावेळी खासदार भोसले यांनी अमित शाह यांच्याकडे या मागण्या केल्या. 

संतोष देशमुख यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

उदयनराजे भोसले म्हणाले, आज एका थोर व्यक्तीला नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत. समतेचा विचार त्यांनी दिला होता. एक युगपुरुष होऊन गेला ज्याने आयुष्य लोकांसाठी वेचले.  स्वराज्याची स्थापना केली, लोकशाहीचा विचार त्यांनी दिला होता. स्वत:चं आयुष्य वेचलं, आता त्यांचा अवमान केला जात आहे, असंही खासदार भोसले म्हणाले. 

अमित शाहांसमोर मोठ्या मागण्या

"छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. १० वर्ष बेल मिळाली नाही पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकडून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेंन्सर बोर्ड स्थापन करण्यात यावं. जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण होत आहे, यामुळे एक सेंसर बोर्डची स्थापना व्हावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. 

Web Title: Government should publish the history of Shivaji, make a non-bailable law regarding the greats Udayanraje bhosle demands from Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.