गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:46 IST2025-07-18T17:45:40+5:302025-07-18T17:46:25+5:30

Raigad News: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने घेतला आहे.

Gopichand Padalkar's demand gets a big success, the name of Nizampur Gram Panchayat near Rayagada is changed | गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने घेतला आहे. आता निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलून तिला रायगडवाडी ग्रामपंचायत असं नाव दिलं जाईल, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव निजामपूर असं आहे, हे नाव बदलण्याची मागणी भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि आमदार राहुल कूल यांनी केली होती. तसेच या ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडूनही अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेरीच हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित झाल्यानंतर सरकारदरबारी निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेरीस आज ग्रामविकास मंत्री जयकुमार रावल यांनी केली.

दरम्यान, आजच्याच दिवशी राज्य सरकारने महाराष्ट्रातील आणखी एका शहराचं नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदललं आहे. आता इस्लामपूर शहर ईश्वरपूर या नावाने ओळखलं जाणार आहे.

Web Title: Gopichand Padalkar's demand gets a big success, the name of Nizampur Gram Panchayat near Rayagada is changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.