शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

पेणच्या गणेशमूर्तींची १०० कोटींची उड्डाणे, देश-विदेशात २० लाख गणेशमूर्ती होणार रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 3:36 AM

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना शेष आहे. मात्र, आतापासूनच अनेक घरांमध्ये बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे.

- दत्ता म्हात्रेपेण  - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना शेष आहे. मात्र, आतापासूनच अनेक घरांमध्ये बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. पेण शहरासह, ग्रामीण परिसरात वस्त्रे, प्रावरणे, अलंकार, जरीकाम यांनी परिपूर्ण असलेल्या तब्बल १० लाख गणेशमूर्तींचे देशभरात वितरण झाले आहे. यापैकी १३ हजार गणेशमूर्ती परदेशात महिनाभरात पोहोचणार आहेत. खराब रस्त्यामुळे गणेशमूर्ती वितरणावर परिणाम होत असून, दररोज १०० गाड्या व टेम्पोद्वारे पेणचे गणपती राज्यात व परराज्यात जात आहेत. पेणमधील गणेशमूर्ती कलेचा व्यवसाय सध्या तब्बल १०० कोटींच्या वर गेल्याचे बोलले जात आहे.गणेशमूर्तींना जीएसटी करातून वगळण्यात आल्याने प्लॅस्टिकबंदी पाठोपाठ जीएसटीचे विघ्न दूर झाल्याने पेणमधील हजारो गणेशमूर्तिकार सुखावले आहेत.देशभरात पर्यावरण रक्षण व संवर्धन ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जात असल्याने इकोफे्रं डली गणेशमूर्तींची मागणी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. शाडूच्या गणेशमूर्तींची मागणी पाहता, या गणेशमूर्ती बनविणारे बरेच ज्येष्ठ मूर्तिकार काळाच्या पडद्याआड गेले आहेत.गणेशमूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी गुजरात सरकारच्या मागणीवरून त्या ठिकाणी नवोदित मूर्तिकारांना प्रशिक्षणसुद्धा दिलेले आहे. सध्या पेणहून तब्बल एकूण गणेशमूर्ती निर्माणातून निम्मे प्रोडक्शन महाराष्टÑ, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, तामिळनाडू या राज्यांमध्ये कच्च्या मूर्ती एप्रिल मे महिन्यातच रवाना होतात. मात्र, या मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात. शाडूच्या गणेशमूर्ती जास्त करून गुजरात व गोवा राज्यात जात असल्याचे पेणमधील कला केंद्राच्या कार्यशाळेकडून सांगण्यात आले. शाडूची माती व त्यापासून मूर्तीची रचना अथवा घडविणारे शेकडो मूर्तिकार निर्माण करणे ही बदलत्या काळाची गरज आहे, असे मूर्तिकार श्रीकांत देवधरांचे म्हणणे आहे. सध्या अनेक पदवीधर युवा कलाकार जोहे-हमरापूर, वडखळ, शिर्की व पेण शहरात नव्या कलाविष्कारांची मूर्तिकलेत शिकवण घेत आहेत.शाडूच्या गणेशमूर्ती दोन फूट उंचीच्या बनविल्या जातात. मोठ्या मूर्ती बनविताना काही अडचणी येतात, शिवाय वाहतूक करताना तुटफूट होण्याची शक्यता असते. म्हणून प्लॅस्टिक आॅफ पॅरिसच्या मूर्तीकडे व्यवसाय म्हणून पाहणे सुलभ वाटत असल्याचे कारागीर सांगतात.पेणच्या हमरापूर जोहे या कलाग्राम कलानगरीत या मूर्तिकला व्यवसायाची भरभराट झाली आहे. येथील जोहे कळवे, हमरापूर या मुख्य सेंटरमध्ये वर्षभर मोठ्या प्रमाणात केला जातो. येथील हजारो युवकांना रोजगारनिर्मितीचे प्रमुख साधन उपलब्ध झाले आहे. या विभागात घराघरांत मूर्तिकलेचे कारखाने आहेत. या ठिकाणी इकोफ्रेंडली गणेशमूर्तीही फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. याची माती दोन्ही प्रकारची गुजरात, राजस्थानमधून मागवावी लागते. वाहतूक खर्च, कामगारांचे वाढते वेतन, रंगाची वाढणारी किंमत, इतर काथ्या व जरीबुटीचे साहित्य या सर्वांचा होणारा वापर मजुरी व वाढणाऱ्या महागाईचा फटका मूर्तिकारांना सोसावा लागतो; पण कला ही जिवंत राहवी, या हेतूने उलाढाल मोठी असली तरीही ना नफा ना तोटा या भावनेतून मूर्तिकार मूर्ती साकारतात.महाराष्टÑ शासनाने या मूर्तिकलेला मोठा हातभार व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.पेणच्या मूर्तिकलेची वैशिष्ट्येमातीच्या गोळ्यापासून मूर्तीची रचना करताना शरीरसौष्ठव, अलंकार, रेखीव चेहरा, आसन, महिरप, किरीट, आभूषण ही मूर्तिकारांची मूर्ती बनविताना जी ठेवण तथा रचना असते ती मनमोहक असते.मूर्ती सुकल्यानंतर, पॉलीशकाम, सफेदा, बॉडीकलर, पंचकलर, गनमशिनने शेडिंग, अस्तर, शाई, नंतर डोळ्यांची रेखीव आखणी या सर्व प्रोसेसमधून जाताना मूर्तिकार व कुशल कारागीर या कलेमध्ये आपले कौशल्य प्रमाणित करतात.या सर्व आकर्षक बाबींमुळे पेणची मूर्तिकला आज तीन पिढ्या होऊनसुद्धा नावीन्याच्या सर्व क्षेत्रामध्ये समरस झाली आहे.म्हणून पेणचे प्रसिद्ध गणपती या बॅनरखाली प्रत्येक शहरात या मूर्ती गणेशभक्त आवडीने खरेदी करतात हे खरे वैशिष्ट.गणेशमूर्तिकारांच्या मागण्यामूर्ती कार्यशाळेत राबणाºया प्रत्येक हाताला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे वयोवृद्ध मूर्तिकारांना सरकारने पेन्शन योजना सुरू करावी. वर्षभरात महिन्यागणिक आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत. वीज व पाणी यामध्ये सवलत मिळावी, तसेच सरकारी जागा गणेशमूर्तिकलेसाठी उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्या अनेक वर्षांपासूनच्या गणेशमूर्ती कारागिरांच्या आहेत. मात्र, सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.फायबरच्या गणेशमूर्तीउत्तम कलाविष्कार साकारणे, हा त्या कलेच्या निर्मात्यांचा नेहमी प्रयत्न असतो. पेणमधील एका कलाकेंद्र कार्यशाळेने ग्राहकांच्या मागणीनुसार फायबरच्या सुरेख व सुबक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. पुणे शहरात प्रतिवर्षी एका आगळ्या बाप्पाची मूर्ती साकारण्याची मागणी येते. यंदा पाच फूट उंचीची कमळावर स्थिरावलेली गणेशमूर्ती साकारण्यात आल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी सांगितले. लालबागचा राजा, वसईचा राजा, जय मल्हार, दगडूशेठ हलवाई यासह यंदा विठूमाउलीच्या गणेशमूर्तीला पसंती मिळत आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसाय