शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

इतिहासातील शाैर्याची साक्ष देणाऱ्या अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची तटबंदी ढासळतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 1:04 AM

मात्र हा विषय केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने विशेष लक्ष दिले गेलेले नाही. दाेन महिन्यांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला.

रायगड : इतिहासातील शाैर्याची साक्ष देणाऱ्या अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याचे बुरूज आणि तटबंदी ढासळत आहे. मध्यंतरी करून निधीला मंजुरी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात निधी वर्ग झाला नसल्याने किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी २०२१ उजाडणार  आहे. कुलाबा किल्ल्यावरील पश्चिमेकडील तटबंदी आणि पूर्वेकडील बुरूज ढासळले आहेत. वेळीच डागडुजी केली गेली नाही, तर अखंड तटबंदी आणि बुरूज नामेशष हाेण्याची भीती शिवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र हा विषय केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने विशेष लक्ष दिले गेलेले नाही. दाेन महिन्यांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांना साेबत घेऊन त्यांनी सर्व्हेक्षण केले हाेते. तटबंदीची, बुरुजांची दुरुस्ती करतानाच काही नावीन्यपूर्ण बदल सुचविले हाेते. त्यावरही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केेले. यासाठी किती निधी लागणार आहे हे गुलदस्त्यात आहे. १२ नोव्हेंबरला मुंबई पुरातत्त्व विभागाने संबंधितांना पत्र पाठवून निधी लवकर वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगत त्यात पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांची सही आहे.

ऐतिहासिक महत्त्व

  • अलिबागच्या वैभवशाली परंपरेत कुलाबा किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
  • अरबी समद्रात असणारा हा किल्ला मिश्रदुर्ग श्रेणीतील आहे. छत्रपती शिवाजी महराजांनी अनेक गड-किल्ले जिंकले. त्यानंतर त्यांची डागडुजी  करून घेतली. 
  • सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे यांच्याकडे या किल्ल्याची धुरा हाेती. शेकडाे वर्षे झाली तरी शाैर्याची साक्ष देत आजही ताठ मानेने हा किल्ला उभा आहे. 

कुलाबा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखाे पर्यटक येथे भेट देत असतात. तसेच किल्ल्यात सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे. दरवर्षी माघी गणेशाेत्सव साजरा केला जातो. १० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या मुख्य दरवाजापासून ते मंदिरापर्यंत दगडांचा पदपथ निर्माण केला हाेता. तसेच काही प्रमाणात सुशाेभीकरणही करण्यात आले हाेते. 

कुलाबा किल्ल्यासाठी केंद्रीय कार्यालयाने निधीला मंजुरी दिली आहे. लवकरच ती रक्कम वर्ग करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात हाेईल. - राजेंद्र यादव, अधीक्षक, पुरातत्त्व विभाग

दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली नाही, तर तटबंदी, बुरूज ढासळण्याची शक्यता आहे. निधी मंजूर झाला आहे, मात्र अद्याप ताे वर्ग झालेला नाही. त्यामुळे डागडुजीसाठी जानेवारी २०२१ उजाडणार आहे.  - किशाेर अनुभवने , गडप्रेमी 

टॅग्स :Fortगडsunil tatkareसुनील तटकरेAditi Tatkareअदिती तटकरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज