शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोलणपाडातील ‘त्या’ ग्रामस्थांचा सत्कार

By admin | Updated: August 26, 2015 00:08 IST

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या जामरु ंग येथील पाझर तलावात एक तरु ण रविवारी बुडला होता. त्या तरु णाला ७० फूट खोल जाऊन बाहेर काढणाऱ्या तिघांना

नेरळ : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या जामरु ंग येथील पाझर तलावात एक तरु ण रविवारी बुडला होता. त्या तरु णाला ७० फूट खोल जाऊन बाहेर काढणाऱ्या तिघांना पोलीस दलातर्फे सन्मानित करण्यात आले.सोलणपाडा गावाच्या हद्दीत जामरु ंग पाझर तलाव आहे. या तलावाची निर्मिती १९८२ मध्ये जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने केली होती. दोन वर्षांपूर्वी या पाझर तलावाची मोठ्या प्रमाणात दुरु स्ती करण्यात आली होती. त्यामुळे पाझर तलावात कुठे खोलगट भाग आहे, कुठे दगडाच्या कपारी आहेत याची पूर्ण कल्पना सोलणपाडा येथील बुजुर्ग लोकांना होती. त्याचा फायदा रविवारी कर्जत पोलिसांना झाला. या परिसरात वर्षासहलीसाठी आलेल्या पुणे येथील तरु णांपैकी २५ वर्षीय राजू तिरुपती बिहिरी हा तरु ण पाझर तलावाच्या पाण्यात उतरला आणि बुडाला. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थ आणि पोहणारे यांनी केलेल्या शोधमोहिमेत पाझर तलावामध्ये ७० फूट खोल त्या तरु णाचा मृतदेह सापडला. त्या तरु णाचा मृतदेह सोलणपाडा गावातील भगवान बांगर, दत्तात्रय सावंत, शिवाजी थरकुडे यांनी पाझर तलावात खोलवर जाऊन बाहेर काढला.त्यांची ही सामाजिक बांधिलकी आणि पोलिसांना मृतदेह शोधण्यासाठी झालेली मदत लक्षात घेऊन त्या प्रमुख तीन व्यक्तींचा सत्कार कर्जत येथे पोलिसांनी केला. जिल्हा पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील यांच्या हस्ते तिघांचा सत्कार रायगड पोलिसांच्या वतीने केला. यावेळी पोलीस निरीक्षक रमेश भोसले, टेंबरे ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश सावंत, ग्रामस्थ शिवाजी बिबवे, अरु ण घाग आदी उपस्थित होते. (वार्ताहर)पोलिसांना केली मदत : पाझर तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना मदत करणाऱ्या सोलणपाडा गावातील भगवान बांगर, दत्तात्रय सावंत, शिवाजी थरकुडे यांचा पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील यांच्या हस्ते सत्कार रायगड पोलिसांच्या वतीने करण्यात आला.