शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:56 IST

पनवेल तालुक्यातील पालीदेवद सुकापूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीने योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने दिला आहे. असे असताना संबंधितावर कारवाई करण्यास रायगड जिल्हा परिषद प्रशासन टाळाटाळ करत आहे.

अलिबाग : पनवेल तालुक्यातील पालीदेवद सुकापूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीने योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने दिला आहे. असे असताना संबंधितावर कारवाई करण्यास रायगड जिल्हा परिषद प्रशासन टाळाटाळ करत आहे. या विरोधात रायगड जिल्हा परिषदेतील भाजपाचे सदस्य अमित जाधव यांनी योगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, महेश पाटील या सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषण सुरू केले आहे.याबाबत गुन्हा दाखल करण्याचे पत्र पालीदेवद ग्रामपंचायतीने १५ नोव्हेंबर रोजी पोलिसांना दिले आहे. त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी आंदोलकांना बुधवारी सायंकाळी केली. मात्र गटविकास अधिकाºयांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार असल्याने त्यांनी तसे करावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरल्याने आजच्या दिवशी उपोषणाचा गुंता सुटला नाही.पाणीपुरवठा समितीने भ्रष्टाचारासारखा गंभीर गुन्हा केलेला आहे. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा अमित जाधव यांनी दिला आहे.२०१४ ते २०१७ या कालावधीत पाणी समितीचे अध्यक्ष एकनाथ भोपी आणि सचिव जी.आर.नाईक यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर केले होते. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे गठण केली होती. या प्रकरणात अनियमितता असल्याचा अहवाल साळुंखे समितीने दिला. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटला तरी, गुन्हा दाखल करण्यात आला नाही, वरवर पाहता हा भ्रष्टाचार २२ लाख रुपयांचा दिसत असता तरी, सखोल चौकशी केल्यास हा आकडा दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा अमित जाधव यांनी केला. याबाबत माहिती अधिकारात मिळालेली माहिती गटविकास अधिकाºयांना सुपूर्द करण्यात आलेली आहे. असे असताना जिल्हा परिषद प्रशासन संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. समितीचे अध्यक्ष भोपी यांनी २० जून २०१८ रोजी पालीदेवद ग्रामपंचायतीकडे १८ लाख रुपये जमा केले आहेत. याचाच त्यांनी रक्कम भरुन गुन्ह्याची कबुली दिली आहे. रक्कम भरल्याने त्यांनी केलेला गुन्हा कमी होत नसल्याचेही ते म्हणाले.यातील गंभीर बाब म्हणजे २००८ साली समितीची स्थापना झाल्यापासून २०१४-२०१५ पर्यंतचे दप्तर मागितले होते, मात्र दप्तर जाळून पुरावा नष्ट केला आहे. सरकारी दप्तर नष्ट करण्याआधी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली नसल्याने हा गंभीर गुन्हा आहे, असे ृग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील यांनी सांगितले. याबाबत कारवाई होण्याचे पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी देत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. पनवेलचे गटविकास अधिकारी डी.एन.तेटगुरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सदरची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी केली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा याच्याशी काहीच संबंध येत नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी