The fall of the revdanda fort | रेवदंडा किल्ल्याच्या तटबंदीची पडझड
रेवदंडा किल्ल्याच्या तटबंदीची पडझड

रेवदंडा : अलिबाग शहराच्या दक्षिणेला सुमारे १७ किलोमीटर अंतरावर रेवदंड्याचा आगरकोट किल्ला आहे. कोकणात रेवदंड्याचा उल्लेख चौल-रेवदंडा असाही केला जातो. १७३० पासून १७६८ पर्यंत चौल हे ऐतिहासिक घटनांचे व व्यापाराचे प्रसिद्ध बंदर होते. १५०५ मध्ये पोर्तुगीज चौलला आले आणि त्यांनी किल्ला बांधला. १६८३ मध्ये छत्रपती संभाजीराजांनी रेवदंडा जिंकण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यात अपयश आले होते.

१७३९ मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांपुढे आपला टिकाव लागणार नाही, हे जाणून १७४० मध्ये पोर्तुगीजांनी चौल प्रदेश मराठ्यांना दिला. चौल-रेवदंड्याला व्यापारामुळे लाभलेली समृद्धी; नैसर्गिक सौंदर्य व वैशिष्ट्यपूर्ण अशा समुद्रकिनाऱ्यामुळे पोर्तुगीज, निजामशाह, आदिलशाह, सिद्धी, फ्रेंच, इंग्रज व मराठे यांनी वेगवेगळ्या कालखंडात चौल-रेवदंड्यावर आपले वर्चस्व गाजवले होते.
किल्ल्याचा परिसर चार ते पाच किलोमीटरचा आहे. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये रेवदंडा गाव वसले आहे.

किल्ल्याला १५ बाजू व ११ बुरुज असल्याच्या नोंदी आहेत. पोर्तुगीज इमारती सोडून मंदिरे, मशीद, चर्च अशा अनेक इमारती व शिलालेख या भागात आहेत. परदेशी पर्यटक किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी येतात. मात्र, तटबंदीची पडझड झाल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत. तिची डागडुजी करण्याची मागणी इतिहासप्रेमी मंडळी करत आहेत.

Web Title: The fall of the revdanda fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.