शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर : ग्रामपंचायतीवर शिवसेना, भाजपची सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 1:48 AM

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर काही ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी २३ जून रोजी मतदान झाले.

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर काही ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी २३ जून रोजी मतदान झाले. अलिबाग तालुक्यातील चेंढरे आणि वरसोली, पेण तालुक्यातील रावे, पनवेल तालुक्यातील चावणे, कराडे खुर्द, जांभिवली तर उरण तालुक्यातील आवरे आणि गोवठणे या ग्रामपंचायतींचा यामध्ये सामावेश होता. शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी तीन ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. तर शेकापला दोन ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. सोमवारी निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. पूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागांवर शेकापची चांगली पकड होती. मात्र यावेळी प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपला मतदारांनी पसंती दिली असल्याचे एकं दरीत जाहीर झालेल्यानिकालावरून स्पष्ट होते.उरणमधील आवरे, गोवठणे ग्रामपंचायतींंवर सेनेचे वर्चस्वउरण : आवरे ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या नीरा सहदेव पाटील यांनी थेट सरपंचपदी बाजी मारली असून शेकापच्या उमेदवार अमृता धनेश गावंड यांचा ८५० मताधिक्याने पराभव करीत २०३८ मते मिळवून आवरे ग्रामपंचायतीमध्ये दणदणीत मतांनी विजय संपादन केला आहे.यामुळे आवरे ग्रामपंचायतीमधील गेल्या अनेक वर्षांच्या शेकापच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. शेकाप सोबत या निवडणुकीत आघाडीत असलेल्या कॉँग्रेसलाही धक्का देऊन शिवसेनेच्या नीरा सहदेव पाटील यांनी विजय मिळवून शिवसेना-भाजपचा भगवा फडकविला आहे.तर प्रभाग १ मधून काँग्रेसचे चेतन म्हात्रे, जयश्री गावंड हे सदस्यपदी निवडून आले आहेत. प्रभाग २ मधून भाजपच्या स्वाती गावंड, शेकापच्या कमल गावंड व शिवसेनेचे गुरुनाथ गावंड हे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग ३ मधून काँग्रेसच्या गीतांजली गावंड, शेकापच्या सविता गावंड व अविनाश गावंड यांनी सदस्यपदी विजय संपादन केला असून, प्रभाग ४ मध्ये शिवसेनेच्या सोनाली म्हात्रे, भाजपच्या प्रणाली म्हात्रे व काँग्रेसचे समाधान म्हात्रे हे सदस्यपदी निवडून आले आहेत. प्रभाग ५ मधून शिवसेनेचे संतोष पाटील व भाजपचे अनिल म्हात्रे सदस्यपदी विराजमान झाले आहेत. आवरेत थेट सरपंचासह एकूण ५ प्रभागांमध्ये शिवसेनेला ३, भाजप ३, शेकाप ३ आणि काँग्रेस ४ सदस्य विजयी झाले आहेत. थेट सरपंचपदाच्या पहिल्याच निवडणुकीत आवरेमधील शिवसेना -भाजप आणि पाले प्रभाग ४ मधील काँग्रेस - भाजप - शिवसेना आघाडीने सरपंच पदाच्या नीरा पाटील यांना तारल्याने आवरे ग्रामपंचायतीवर शेकापची अनेक वर्षे असलेली सत्ता हातून गेल्याने हा पराभव शेकापच्या जिव्हारी लागला आहे.गोवठणे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी शिवसेनेच्या प्रणिता प्रदीप म्हात्रे यांनी १०२१ मते मिळवून भाजपच्या दीप्ती विक्रांत वर्तक यांचा २५० मतांनी पराभव करून थेट सरपंच पदावर विजय संपादन केला आहे. शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - मनसे आघाडीने एकत्रितपणे थेट सरपंचासह ९ पैकी ५ जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत प्रभाग१ मधून शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, काँग्रेसच्या सविता वर्तक व भाजपचे रुपेश म्हात्रे सदस्यपदी निवडून आले आहेत. तर प्रभाग २ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान म्हात्रे ,भाजपचे संतोष वर्तक व प्राची पाटील या सदस्यपदी निवडून आल्या आहेत. प्रभाग ३ मध्ये काँग्रेसच्या कविता म्हात्रे, शेकापच्या रत्नमाला म्हात्रे व भाजपचे मनोज पाटील हे सदस्यपदी विराजमान झाले आहेत. निवडणूक निकालानंतर उरणचे आ. मनोहर भोईर यांच्या कार्यालयाजवळ सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.पनवेलमध्ये भाजपला दोन तर शेकापला एक ग्रामपंचायतपनवेल : पनवेल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. चावणे, कराडे खुर्द तसेच जांभिवली या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप वरचढ ठरली असल्याचे दिसून येत आहे. कराडे खुर्द व जांभिवली या दोन ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे, तर चावणे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात शेकापला यश आले आहे. जांभिवली ग्रामपंचायत निवडणुकीत रिया कोंडिलकर या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांनी अंकिता पाटील यांचा अवघ्या २७ मतांनी पराभव के ला.२चावणे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत सुप्रिया सोनावळे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यांनी पूनम पाटील यांचा १३१ मतांनी पराभव केला. तर कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहावयास मिळाली. भारती चितळे या तिरंगी लढतीत विजयी झाल्या आहेत. त्यांना तीन उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ४१८ मते मिळाली आहेत. त्यांच्या पाठोपाठ पूजा जाधव ३९५ आणि करुणा गायकवाड यांना ३०३ मते मिळाली आहेत. पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामीण भागात शेकापचे मोठे वर्चस्व आहे. मात्र नजीकच्या काळात शेकापच्या ताब्यातून ग्रामपंचायती भाजपने आपल्या ताब्यात घेतल्या आहे .रावे सरपंचपदी युतीच्या संध्या पाटील पेण : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रावे या माजीमंत्री रविशेठ पाटील यांच्या जन्मगावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्यांदा झालेल्या थेट सरपंच निवडणुकीत संध्या पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रेखा पाटील यांचा ८०० मतांनी पराभव केला. पाटील यांचा विजय निश्चित झाल्यावर शिवसेना- भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.रावे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी पेण तहसील कार्यालयाच्या सभागृहात झाली. मतमोजणीत ५ प्रभागांमध्ये संध्या पाटील यांना प्रभाग क्र. १ मध्ये ३७९ मते, प्रभाग २ मध्ये २४९, प्रभाग ३ मध्ये ३३७, प्रभाग ४ मध्ये २१५ प्रभाग ४ अ मध्ये १८९ आणि प्रभाग ५ मध्ये ४३२ मते अशी एकूण १८०१ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रेखा पाटील यांना प्रभाग क्र. १ मध्ये ९१, प्रभाग २ मध्ये १३७, प्रभाग ३ मध्ये ३५३, प्रभाग ४ मध्ये १७२ प्रभाग, ४ अ मध्ये २१३ आणि प्रभाग ५ मध्ये ७९ मते अशी एकूण १०४५ मते मिळाली. रावे ग्रामपंचायत ही आजतागायत माजीमंत्री रविशेठ पाटील यांच्या वर्चस्वाखाली राहिल्याने संध्या पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्याचे चित्र निकालात स्पष्ट दिसून आले. मात्र तरीही शेकाप, राष्टÑवादी, काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली मते ही निर्णायक अशी मानली जात आहे. विजयी उमेदवार संध्या पाटील यांचे माजी मंत्री रविशेठ पाटील, माजी जि. प. सदस्या कौशल्य पाटील आदींनी अभिनंदन केले.चेंढरे ग्रामपंचायतीवर शेकापचा लाल बावटाअलिबाग : तालुक्यात रविवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा लाल बावटा पुन्हा फडकला तर वरसोली ग्रामपंचायतीमध्ये आघाडीने आपला गड राखण्यात यश मिळवले आहे. चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे १३ आणि आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. वरसोली ग्रामपंचायतीमध्ये आघाडीला १५ आणि शेकापला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवारांनी निवडणूक जिंकल्याने एकच जल्लोष केला.अलिबाग तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची निवडणूक २३ जून रोजी पार पडली. चेंढरे ग्रामपंचायत शेकापकडे तर वरसोली ग्रामपंचायत आघाडीकडे होती. या दोन्ही ग्रामपंचायतीत सत्ताधारी पक्षाने आपले गड राखले आहेत. मात्र काही सदस्यांना अपयश आल्याने एक हाती सत्ता आणण्याच्या स्वप्नात मात्र सुरुंग लागल्याचे बोलले जाते.मागील पाच वर्षांपूर्वी चेंढरे ग्रामपंचायतीवर शेकापची सत्ता होती. त्यावेळी शेकापचे १३ तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला चार जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीच्या काही कालावधीनंतर यातील निवडून आलेले तीन उमेदवार शेतकरी कामगार पक्षात गेले होते, तर दत्ता ढवळे हे कायम शेकापच्या विरोधात राहिले. रविवारी २३ जून रोजी झालेल्या निवडणुकीत ही शेकापला १३ तर आघाडीला चार जागा मिळाल्या. त्यामुळे जनतेने दिलेल्या निकालात काहीच बदल झाला नसल्याचे दिसून येते. फक्त नवीन चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिली आहे.वरसोली ग्रामपंचायतीमध्ये पाच वर्षांपूर्वी आघाडीचीच सत्ता होती. त्यावेळी आघाडीला १५ जागांपैकी १४ जागांवर विजय मिळाला होता.एकच जागा शेकापकडे गेली होती. मात्र सोमवारी लागलेल्या निकालात वरसोली ग्रामपंचायतीमध्ये शेकापने थेट दोन जागा जिंकल्या आहेत. त्यांना एका जागेचा फायदा झाल्याचे दिसून येते. शेकापच्या नर्मदा वर्तक सलग चार वेळा निवडून आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकाल लागताच निवडून आलेल्या उमेदवारांना उचलून कार्यकर्त्यांनी चांगलाच आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :Raigadरायगडgram panchayatग्राम पंचायत