श्रीवर्धनमधील रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण; चालकांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 11:36 PM2020-09-13T23:36:14+5:302020-09-13T23:36:39+5:30

तालुक्यातील बहुतेक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत, तर काही रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. बोर्लीपंचतन ते शिस्ते या गावांदरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे.

Eclipse of potholes on the road in Shrivardhan; Driver's workout | श्रीवर्धनमधील रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण; चालकांची कसरत

श्रीवर्धनमधील रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण; चालकांची कसरत

Next

- गणेश प्रभाळे

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार, या चिंतेत परिसरातील शेतकरी, प्रवासी व वाहनचालक आहेत. तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेत वाढ झाली आहे. अपघातांचे प्रमाणही वाढल्याने डोकेदुखी वाढली आहे.
तालुक्यातील बहुतेक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत, तर काही रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. बोर्लीपंचतन ते शिस्ते या गावांदरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. दिघीपासून आदगाव, तसेच वेळास, मेंदडी व गोंडघर या सर्व परिसरातील ग्रामस्थांना बोर्लीपंचतन शहरातील बाजारपेठ व इतर वैद्यकीय उपचारासाठी यावे लागते. मात्र, बोर्लीपंचतनकडे जाणाऱ्या रस्त्याला खड्डेच असल्याने आजारी, तसेच वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. वेळास ते आदगाव रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे ना अधिकाºयाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींना पडली आहे. सध्या महामार्ग असलेल्या माणगाव ते दिघी मार्गावरील दिघी-वेळास या दरम्यानचा रस्ता वनखात्याच्या आडकाठीमुळे रखडला आहे. हाही रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. बोर्लीपंचतन ते वांजळे हा रस्ता नुकताच बनवला होता. मात्र, निकृष्ट कामामुळे रस्त्यांवर खड्डेच पडले आहेत. धनगरमलईकडे जाणाºया रस्त्यांवरही असेच खड्डे पडले आहेत. लोकप्रतिनिधींनी
याकडे लक्ष दिल्याने रस्ते सुस्थितीत होतील, हिच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने, येथील संबंधित रस्ते बनवणारे कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामकाज होत नाही.

पावसामुळे शिस्ते गावाजवळील रस्त्यावर दरवर्षी पुराचे पाणी येते. त्यामुळे हा रस्ता खड्डेमय बनतो. यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीत नव्याने साकव तयार करून रस्त्याची उंची वाढवल्याने या रस्त्याची दुरवस्था व पुरातील पाण्याचा
धोका टळेल. - देवेंद्र नार्वेकर, रहिवाशी, दिवेआगर

बोर्लीपंचतन परिसरातील रस्ते खड्डेमय बनले असून, सध्या रस्त्याची दुरुस्ती झाल्यास तात्पुरता प्रवास
सोयीचा होईल.
- प्रवीण वडके,
चालक.

या रस्त्यांचे कामे बजेटनुसार मंजूर झाले आहेत. उर्वरित प्रक्रियेनुसार या रस्त्यांच्या डागडुजीसोबत नव्याने डांबरीकरण लवकरच होईल.
- श्रीकांत गनगणे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन

Web Title: Eclipse of potholes on the road in Shrivardhan; Driver's workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड