दांडफाटाजवळ ऑइलमुळे अपघात, दुचाकी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:40 IST2019-05-02T23:40:08+5:302019-05-02T23:40:42+5:30

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील दांडफाटाजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ऑइल सांडल्याने एम. एस. अनिल व इटली अमर श्रावणी हे अष्टविनायक दर्शन करून मुंबई येथे परतत असताना त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला.

Due to oil injuries, two-wheelers collapsed | दांडफाटाजवळ ऑइलमुळे अपघात, दुचाकी घसरली

दांडफाटाजवळ ऑइलमुळे अपघात, दुचाकी घसरली

मोहोपाडा : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील दांडफाटाजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ऑइल सांडल्याने एम. एस. अनिल व इटली अमर श्रावणी हे अष्टविनायक दर्शन करून मुंबई येथे परतत असताना त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. या वेळी गाडीतून सांडलेल्या ऑइलवरून पुन्हा कोणी घसरून अपघात होऊ नयेत म्हणून टेंभरी ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप ठोंबरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत येथे माती टाकली.

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून एम एच ४३ बीजे २८३२ ही बुलेट मुंबईच्या दिशेने जात असताना दांडफाटा येथे रस्त्यावर पडलेल्या ऑइलवरून घसरून अपघात झाला. या अपघातात इटली अमर श्रावणी यांच्या पायाला दुखापत झाली, तर एम.एस. अनिलही जखमी झाले. या वेळी जखमींना त्वरित उपचारार्थ रसायनी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हा अपघात घडल्यानंतर टेंभरी ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप ठोंबरे तेथे हजर होते, त्यांनी दांडफाटा थांब्याजवळील गॅरेजमधून फावडा व घमेले आणून सांडलेल्या ऑइलवर माती टाकली. या वेळी त्यांच्यासोबत जयवंत म्हस्कर, दीपक म्हात्रे उपस्थित होते.

Web Title: Due to oil injuries, two-wheelers collapsed