शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाची बातमी! रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी

By राजेश भोस्तेकर | Updated: May 17, 2025 15:36 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश; नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर, संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात १७ मे २०२५ ते ३ जून २०२५ या कालावधीत ड्रोन व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या परिसरात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणास सक्त मनाई करण्यात आली आहे.

हा आदेश पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या शिफारशीनुसार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणतीही शंका असल्यास संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

टॅग्स :RaigadरायगडPoliceपोलिसOperation Sindoorऑपरेशन सिंदूर