महाडमधील चोरट्याचे रेखाचित्र सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:43 IST2019-07-25T22:42:53+5:302019-07-25T22:43:05+5:30
महाड शहरातील सरेकर आळी येथील सचिन दत्तात्रेय देवरुखकर (२९) यांच्या राहत्या घरातून ११ डिसेंबर २०१८ रोजी सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती.

महाडमधील चोरट्याचे रेखाचित्र सादर
दासगाव : महाडमध्ये २०१८ मध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणातील चोरट्याचे रेखाचित्र महाड शहर पोलिसांनी सादर केले आहे. या रेखाचित्रातील व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाड शहरातील सरेकर आळी येथील सचिन दत्तात्रेय देवरुखकर (२९) यांच्या राहत्या घरातून ११ डिसेंबर २०१८ रोजी सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याबाबत सचिन देवरुखकर यांनी महाड शहरात रीतसर तक्रार दाखल केली होती. जवळपास ८१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने या चोरीत लंपास केले होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. रेखाचित्रातील व्यक्ती आढळल्यास माहिती द्यावी, असे आवाहन महाड शहर पोलीस ठाण्याचे अन्वेषण अधिकारी पी. एस. कापडेकर यांनी दिली आहे.
महाड तालुक्यात चोरीचे सत्र सुरू आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र, चोरट्यांचा महाड शहर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.