शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका केंद्राची पडझड

By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST

रायगड जिल्ह्यातून उत्तम परिचारिका निर्माण करणाऱ्या अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी तळ आणि दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातून उत्तम परिचारिका निर्माण करणाऱ्या अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी तळ आणि दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून एक प्रशिक्षणार्थी जखमी झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत सातत्याने कळवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.परिचारिकेचे प्रशिक्षण घेण्यासाठी ठाण्यातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रावरच रायगड जिल्ह्यातील मुलींना अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे जिल्ह्यातील मुलींना जिल्ह्यातच परिचारिकेचे शिक्षण देता यावे, यासाठी अलिबागच्या सरकारी रुग्णालयाच्या परिसरात ७० च्या दशकात या परिचारिका प्रशिक्षण केंद्राची इमारत उभारण्यात आली होती. सध्या या इमारतीमध्ये एएनएम आणि जीएनएमचे कोर्स शिकविले जातात. एएनएमसाठी ३९ आणि जीएनएमसाठी ६४ मुली प्रशिक्षण घेत आहेत. या मुली त्याच इमारतीमधील वसतिगृहात वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे एक परिचारिका अधिकारी, सहा. प्राध्यापक आणि तीन कर्मचारी असे एकूण नऊजण येथे काम करतात. इमारतीच्या तळमजल्यावरील प्रवेशद्वाराच्या वरील बाजूचाही स्लॅब कोसळला असून तेथेच सुरक्षा रक्षक बसतो. स्लॅब पडला तेव्हा सुदैवाने सुरक्षा रक्षक तेथे नव्हता. येथील स्वच्छतागृहाचाही स्लॅब कोसळला असून पावसाळ््यात तेथून पाण्याचा धबधबाच वाहत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या मजल्याकडे जाणारे जीणेही जीर्ण झाले असून भेगा पडल्या आहेत. दुसऱ्या मजल्याच्या रूममध्ये शनिवारी स्लॅब कोसळल्याने विद्यार्थिनीच्या पायाला दुखापत झाली. जीव मुठीत घेऊन करावे लागते कामइमारतीची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सातत्याने पत्रव्यवहारही केला आहे. मात्र अलिबागचे उपअभियंता दिलीप विडेकर यांनी कोणतीच कारवाई केली नाही. आम्हाला जीव मुठीत घेऊन काम करावे लागते, असे परिचारिका अधिकारी शुभांगी मोरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.परिचारिका इमारतीचा स्लॅब पडला आहे. ही वस्तुस्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दुरुस्तीबाबत कळविले आहे. सध्या ज्या मजल्यावरील स्लॅब कोसळला आहे, तेथील मुलींची व्यवस्था नवीन इमारतीमध्ये केली आहे.- डॉ. बाहुबली नागावकर, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड