शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

‘आमचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका’; रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजपची उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 07:17 IST

व्हिडीओ बाहेर काढण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाही व रायगडला शोभणारी नाही, असे दरेकर म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क , माणगाव : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदेसेना आणि अजित पवार गटात वाद सुरू असताना यामध्ये भाजपने उडी घेतली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे पत्रकारांशी बोलताना मंगळवारी दोन्ही पक्षांना कानपिचक्या देत भाजपचेही तीन आमदार आहेत, हे विसरू नका, असे विधान केले. 

जनतेने महाविकास आघाडीला नाकारून महायुतीवर विश्वास टाकला आहे. महायुतीच्या सर्वच आमदार, मंत्र्यांनी या विश्वासाला शोभेल, असे वागले पाहिजे. पालकमंत्रिपदासाठी रस्त्यावर वादविवाद होणे हे महायुतीला शोभा देणारे नाही. पालकमंत्रिपद म्हणजे आपल्या जीवन- मरणाचा प्रश्न नाही, असे स्पष्ट करत व्हिडीओ बाहेर काढण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाही व रायगडला शोभणारी नाही, असे दरेकर म्हणाले. 

वाद घालू नकापदासाठी दोघेही असेच भांडत राहिले, तर ‘तुला न मला...’ अशी अवस्था होईल. भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत.  मीसुद्धा मंत्रिमंडळात असायला हवे होते; परंतु पक्षनेतृत्वाच्या पुढे गेलो नाही. सहकारी पक्षाने आपापल्या नेतृत्वाकडे भूमिका मांडावी, असा सल्ला त्यांनी दिला.  महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या भाजपप्रवेशाबाबत विचारले असता, भाजप चांगल्या विचारांच्या माणसांना पक्षात नेहमीच संधी देत आला आहे. स्नेहल जगताप यांचा प्रवेश कधी आहे, ते नक्की माहीत नाही. मात्र, त्या भाजपमध्ये प्रवेश करत असतील, तर स्वागत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपा