शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिवेआगर पर्यटनस्थळ बनले कासवांचे गाव, पालकमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 08:58 IST

कासव संवर्धन प्रकल्पाला चांगला प्रतिसाद

गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या प्रसिद्ध पर्यटनस्थळी आता कासव संवर्धन चळवळ रुजत आहे. दुर्मीळ होत असलेल्या ऑलिव्ह रिडले या कासव प्रजातीच्या संवर्धन दृष्टीने रविवारी कासवांच्या पिल्लांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. कासवांच्या दुर्मीळ होत असलेल्या प्रजातींचे संवर्धन होण्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

दिवेआगर समुद्रकिनारा हा कासवांच्या मादीला अंडी घालण्यासाठी नेहमीच सुरक्षित असलेला किनारा आहे. ६० दिवसांपूर्वी ऑलिव्ह रिडले या कासव मादीने ११८ अंडी घातली आहेत. त्याचे वनविभाग श्रीवर्धन, ग्रामपंचायत दिवेआगर, कांदळवन दिवेआगर, सह्याद्री निसर्ग संस्था यांच्या वतीने घरटी तयार करून अंड्याची जोपासना करण्यात आली. पुढे ६० दिवसांनंतर यातून बाहेर आलेल्या पिल्लांना रविवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये समुद्रामध्ये सोडण्यात आले. या कासव संवर्धन प्रकल्पात दिवेआगर सरपंच उदय बापट, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, वनक्षेत्रपाल श्रीवर्धन मिलिंद राऊत, वनपाल बोर्ली पंचतन सुनील गुरव, वनरक्षक बोर्ली पंचतन दिनेश गिऱ्हाने, वनरक्षक शेख बुरान शेख इसा पर्यटक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा पहिल्यांदाच हा महोत्सव झाला.

११८ पिल्लांना समुद्रात सोडलेज्यावेळी कासव अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सक्षम होतात, त्याच वेळी हा महोत्सव भरवला जातो. कासवांना समुद्रात सोडण्याची संपूर्ण प्रकिया पर्यटकांना पाहायला मिळते. समुद्र किनारी वनविभाग तसेच ग्रामपंचायत दिवेआगर, सह्याद्री निसर्ग संस्था, कांदळवन संस्था, कासव मित्र यांच्या माध्यमातून आतापर्यंत ११८ पिल्लांना समुद्रात सोडले. 

ऑलिव रिडलेची प्रजाती धोक्यातऑलिव रिडले या प्रजातीचे कासव काही वर्षांपूर्वी कमी झाले होते. त्यामुळे या प्रजातीच्या कासवांमध्ये वाढ व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले समुद्र किनारी कासव संवर्धन संस्थेकडून एक मोहीम सुरू केली. 

कासवांच्या काही प्रजाती दुर्मिळ होत चालल्या आहेत. यावर जनजागृती करीत दुर्मिळ प्रजांतीचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने विविध संस्था कार्य करीत आहेत. शासनाच्या वतीनेदेखील आवश्यक सहकार्य करण्यात येत आहे.- आदिती तटकरे, पालकमंत्री

 

टॅग्स :thaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई