दिवेआगर सुवर्णगणेश चोरी प्रकरण : देवस्थानला सोने परत देण्याबाबत गृहमंत्री सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 06:49 AM2020-01-20T06:49:15+5:302020-01-20T06:49:44+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर सुवर्ण गणेशमूर्ती चोरी प्रकरणातील सोने देवस्थान ट्रस्टकडे देण्याच्या दृष्टीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टीच्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली.

Divanagar Gold Ganesh Theft Case: Home Minister positive about giving back gold to Devasthan | दिवेआगर सुवर्णगणेश चोरी प्रकरण : देवस्थानला सोने परत देण्याबाबत गृहमंत्री सकारात्मक

दिवेआगर सुवर्णगणेश चोरी प्रकरण : देवस्थानला सोने परत देण्याबाबत गृहमंत्री सकारात्मक

Next

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर सुवर्ण गणेशमूर्ती चोरी प्रकरणातील सोने देवस्थान ट्रस्टकडे देण्याच्या दृष्टीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टीच्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. या वेळी देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे सुवर्णगणेशाची मूर्ती प्रकटल्याने दिवेआगरची एक नवी ओळख जगासमोर आली. प्राचीन सुवर्ण गणेशमूर्ती पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांच्या रांगा दिवेआगरमध्ये लागत असत. काही काळातच पर्यटन क्षेत्र म्हणून दिवेआगरची प्रसिद्धी वाढली, आणि २१ मार्च २०१२ रोजी दरोडेखोरांनी ही सुवर्णमूर्ती चोरून नेली. दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले; आणि मूळ मूर्तीचे सोने सरकार दप्तरी जमा झाले. या मूर्तीमध्ये लाखो भाविकांच्या धार्मिक भावना दडल्या आहेत, त्याचबरोबर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली ही गणेशमूर्ती मूळ सोन्यात प्रतिकृती घडवावी अशी असंख्य भाविकांची मागणी आहे. त्यामुळे येथील खुंटलेल्या पर्यटन व्यवसायासही पुन्हा चालना मिळेल व भाविकांची मूर्तीप्रति असलेली आस्था कायम टिकून राहील. या सर्व बाबी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी सांगितल्या. यावर तत्काळ कायदेशीर बाबींची पूर्तता करून मूर्तीचे सरकार दप्तरी जमा असलेले सोने देवस्थानाकडे परत देण्यासाठीची सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली असल्याची माहिती दिवेआगर सुवर्णगणेश देवस्थान गणपती देव पूजा नेमणूक ट्रस्ट अध्यक्ष महेश पिळणकर यांनी दिली. राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीच्या वेळी देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष महेश पिळणकर, सदस्य उदय बापट, लाला जोशी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यटनाला चालना मिळेल

दिवेआगर येथे सुवर्णगणेशाची मूर्तीची मूळ सोन्यात प्रतिकृती घडवण्याची अनेकांची मागणी आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळू शकेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: Divanagar Gold Ganesh Theft Case: Home Minister positive about giving back gold to Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड