शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

जनतेचा विकास हाच माझा ध्यास- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:24 AM

रायगडच्या मातीने सदैव आपली अस्मिता अबाधित ठेवत नावीन्याचा स्वीकार करून निरंतर लढा दिला आहे.

श्रीवर्धन : रायगडच्या मातीने सदैव आपली अस्मिता अबाधित ठेवत नावीन्याचा स्वीकार करून निरंतर लढा दिला आहे. देशात कमळाची त्सुनामी असताना श्रीवर्धनच्या समुद्रातील लाटांनी माझा संसद भवनापर्यंतचा रस्ता निर्माण केला. श्रीवर्धनच्या जनतेचा विकास हाच माझा ध्यास असेल असे सुनील तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित विजयी मिरवणुकीची सांगता शिवाजी चौकात झाली, त्या प्रसंगी नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी जनतेशी संवाद साधला.मी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव प्राधान्य दिले व देत आहे. आज त्याचे फलित म्हणून मला श्रीवर्धन मतदारसंघातून भरघोस मताधिक्य मिळाले आहे. जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास आगामी काळात निर्विवादपणे सिद्ध करून रायगडच्या मातीची अस्मिता संसदेत उमटल्याशिवाय राहणार नाही. मी आजन्म साधा कार्यकर्ता आहे व भविष्यातसुद्धा साधा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन. यशाची हवा आजपर्यंत कदापि माझ्या डोक्यात गेली नाही व आगामी काळातसुद्धा यशाने मी हुरुळून जाणार नाही असे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.श्रीवर्धन तालुक्याला विकासकामासाठी कधीच निधीची कमतरता भासू दिली नाही. आता खासदार निधीतून श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासकामांना चालना देण्याचे माझे दायित्व आहे. माझा राजकीय प्रवास बॅ. अंतुले यांच्याशी मिळते जुळते आहे. अंतुले याचा राजकीय वसा मला प्राप्त झाला आहे. राजकारणाच्या माध्यमातून कोकणचा विकास साधण्याची किमया मी करून दाखवणार आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. या मिरवणूक सांगतेच्या प्रसंगी अनिकेत तटकरे यांनी श्रीवर्धनमधील जनतेचे आभार मानले, ही विजयी मिरवणूक श्रीवर्धन शहराच्या प्रवेशद्वार ते शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, नरेंद्र भुसाने, दर्शन विचारे, गणेश पोलेकर, राजेंद्र भोसले, मोतीराम परभळकर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरे