जेएनपीएमध्ये विकास केंद्र; ५ वर्षांत २५ हजार नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:47 IST2025-08-16T09:47:43+5:302025-08-16T09:47:43+5:30

युरोपसह जपानमध्ये रोजगार संधी मिळणार : उन्मेष वाघ यांचा विश्वास

Development center in JNPA 25 thousand jobs in 5 years | जेएनपीएमध्ये विकास केंद्र; ५ वर्षांत २५ हजार नोकऱ्या

जेएनपीएमध्ये विकास केंद्र; ५ वर्षांत २५ हजार नोकऱ्या

मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीएमध्ये अत्याधुनिक शिक्षण व विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. जेएनपीए, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेडचा हा एकत्र प्रकल्प असून देशातील लॉजिस्टिक कौशल्यविकास क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याद्वारे येत्या पाच वर्षात २५ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

वाहन चालकांना जागतिक स्तरावरील मान्यता मिळणार असून, त्यांना भारताबरोबरच युरोपसह जपान आणि आदी देशांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जेएनपीए तथा व्हीपीपीएलचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी ही माहिती दिली.

स्वातंत्र्य दिन उत्साहात 

देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन जेएनपीएने उत्साहाने साजरा केला. यावेळी प्रशासन भवनात आयोजित कार्यक्रमात वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जेएनपीएच्या संचालक मंडळाचे सदस्य, वायसीएमओयूचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


मोठ्या संस्थांचे प्रमाणपत्र

केंद्रात पाच वर्षांच्या कालावधीत २५ हजारांहून अधिक एचएमव्ही, एलएमव्ही चालक व साहाय्यक कर्मचाऱ्यांना निवासी व गैरनिवासी स्वरूपात मोफत जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी आरटीओ, एएसडीसी, आयआरयू आणि इतर संस्थांकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

वाढवण प्रगतिपथावर

जागतिक स्तरावरील वर्षाकाठी अडीच कोटी कंटेनर हाताळणी क्षमतेचे नियोजित वाढवण बंदराचे काम प्रगतिपथावर आहे.

वाढवण बंदरासारख्या आगामी भव्य प्रकल्पांद्वारे भारताच्या सागरी क्षमतांना अधिक बळकटी देऊन जागतिक पोहोच वाढविण्यास सज्ज आहोत, अशी माहिती जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ या सोहळ्यात यांनी दिली.
 

Web Title: Development center in JNPA 25 thousand jobs in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.