शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

coronavirus: रायगडवरील दुहेरी संकटाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, कोरोनाच्या व्यवस्थापनाबरोबरच पाणीप्रश्नाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:47 AM

तलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : कोरोना विषाणुचा मुकाबला करताना प्रशासनाची सर्व शक्ती कोरोनासाठी खर्च होत आहे. त्यामुळे नियमीत आणि दैनंदीन कामांचे व्यवस्थापन करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीटंचाईचा प्रश्न हाताळताना प्रशासनाला काळजी घ्यावी लागत आहे. कडक उन्हाच्या झळा वाढत असतानाच पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होत आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल २९२ गाव-वाड्यांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. ५१ हजार ७६३ नागरिकांना ३१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रखर उन्हाचा तडाखा वाढ आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी नागकिरांना संघर्ष करावा लागत आहे. जिह्यात मोठ्या संख्येने पाऊस पडून देखील योग्य नियोजना अभावी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.sतलाव, विहीरी, बोअरवेल यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. पेण तालुक्याला याची अधिक झळ बसली आहे. येथील ११ गावे आणि ८२ वाड्या अशा एकूण ९३ ठिकाणच्या २२ हजार २५० नागरिकांना सात खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरोनाच्या कालावधीत पाणीटंचाईवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कोणत्याच ठिकाणी पाण्याची टंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.१५ तालुक्यांपैकी ज्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती आहे, अशा गाव, वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा होत आहे.२९२ गावांना टँकरने पाणी : उरण तालुक्यातील ५ वाड्यांमधील ९९८ नागरिकांना दोन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील ५ गावे, ५ वाड्या एकूण १० गाव/वाड्यांमधील ४ हजार ८०५ नागरिकांना दोन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जतमधील ३ गावे, १० वाड्या एकूण १३ गाव/वाड्यांमधील एक हजार ५६० नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खालापूरमधील १ गाव, ४ वाड्या अशा ५ गाव/वाड्यांमधील १ हजार ५५० नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील २ गावे, ४ वाड्या अशा ६ गाव/वाड्यांमधील १ हजार ४०५ नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील ४ गावे, २ वाड्या अशा ६ गाव/वाड्यांमधील एकूण २ हजार ८९६ नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीने एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाडमधील ७ गावे, ५५ वाड्या अशा ६२ गाव/वाड्यांमधील एकूण २ हजार ३६५ नागरिकांना ५ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पोलादपूरमधील ३० गावे, ५७ वाड्या अशा ८७ गाव/वाड्यांमधील एकूण ११ हजार २३० नागरिकांना ६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. श्रीवर्धनमधील एका गावातील ३४८ नागरिकांना एका खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुरुडमधील एका गावातील ७४० नागरिकांना एका खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर तळा तालुक्यातील १ गाव, २ वाड्या, ३ गाव/वाड्यांमधील एकूण १ हजार ६१६ नागरिकांना दोन खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यांमधील एकूण ६६ गावे, २२६ वाड्या अशा मिळून एकूण २९२ गाव/वाड्यांमधील एकूण ५१ हजार ७६३ नागरिकांना ३० खासगी, सामाजिक संस्थेच्या मदतीने एक अशा ३१ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे,- सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), रायगड 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwater scarcityपाणी टंचाईRaigadरायगड