Coronavirus: दक्षिण रायगडात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण; श्रीर्वधन-भोस्ते गाव प्रशासनाने केले सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 17:22 IST2020-04-17T17:22:35+5:302020-04-17T17:22:47+5:30

गावात भीतीचे वातावरण, संपर्कातील व्यक्तींची पनवेलला रवानगी, अन्य नागरिकांचा शोध सुरु

Coronavirus: Corona's first patient found in southern Raigad; Sealed by Srivardhan-Bhoste village administration | Coronavirus: दक्षिण रायगडात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण; श्रीर्वधन-भोस्ते गाव प्रशासनाने केले सील

Coronavirus: दक्षिण रायगडात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण; श्रीर्वधन-भोस्ते गाव प्रशासनाने केले सील

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात कोरोनाचा पहीला रुग्ण आढळला आहे. 4 एप्रिल रोजी हा रुग्ण आपल्या परिवारासह भोस्ते गावात आला होता. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेले पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली यांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणो सदरच्या रुग्णाने गावातील खासगी दवाखान्यात उपचार घेतले असल्यान तो डॉक्टर, पॅथोलॉजी लॅब कर्मचारी आणि रिक्षा ड्रायव्हर यांना सायंकाळी उशिरा पनवेलला पाठवण्यात येणार असल्याची माहिती सरकारी रुग्णालयाचे डॉ. मधुकर ढवळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

भोस्ते गावात कोरोनाचा पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनामार्फत भोस्ते गाव सील करण्यात आले आहे. भोस्ते गावात आढळलेला रुग्ण हा वरळी येथे आपल्या परिवारासह राहातो. वरळी येथे कोरोनाचे मोठय़ा संख्येने रुग्ण आढळून आल्याने वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. सातत्याने येथे कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने सदरच्या व्यक्तीने वरळी सोडण्याचा निर्णय घेतला. 4 एप्रिल रोजी तो आपल्या परिवारासह श्रीवर्धन-भोस्ते या गावी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोचला. त्यानंतर काही दिवसांनी त्याला ताप आल्याने स्थानिक डॉक्टर रुद्रावार यांच्या दवाखान्यात रिक्षातून नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यावर त्याला रक्त तपासण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याच्या रक्ताची तपासणी स्थानिक पॅथोलॉजी लॅबमध्ये करण्यात आली. त्याच्या शरीरात फक्त बाराशेच पांढ:या पेशी होत्या, तसेच प्लेटलेट्सचे प्रमाण हे फक्त 47 हजार होते. त्यानंतर त्याला श्रीवर्धन येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. त्याची प्रकृती ठिक नसल्याने त्याला तातडीने पनवेल येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथील डॉक्टरांच्या सल्याने अधिक उपचारासाठी त्याला लगेचच एमजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, असे डॉक्टर ढवळे यांनी सांगितले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर काढले. त्यानंतर त्याचा 12 एप्रिल रोजी स्व्ॉब घेण्यात आला होता. त्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीत तो रुग्ण गावात आला कसा असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भोस्ते गाव सील करण्यात आले आहे. त्या ठिकाणी प्रांताधिकारी, पोलिस, ग्रामपंचायत, डॉक्टरांचे पथक तैनात आहे. गाव निजर्तुकीकरण करण्यात आले आहे.

रुग्णाच्या संपर्कात आलेली त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच डॉ.रुद्रावार, पॅथोलॉजी लॅबचे कर्मचारी, रिक्षा ड्रायव्हर यांना सायंकाळी उशिरा पनवेलच्या रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. सदरचा रुग्ण गावात कोणात्या नागरिकांच्या संपर्कात आला होता. याचा तपास करण्याचे आव्हान पोलिस आणि आरोग्य यंत्रणोला पार पाडावा लागणार आहे.

Web Title: Coronavirus: Corona's first patient found in southern Raigad; Sealed by Srivardhan-Bhoste village administration