विहूर धरणातून दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थ त्रस्त : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:14 AM2020-10-28T00:14:45+5:302020-10-28T00:15:04+5:30

Raigad News : या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली.

Contaminated water supply from Vihur dam, villagers suffer: Complaint to Zilla Parishad President | विहूर धरणातून दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थ त्रस्त : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार   

विहूर धरणातून दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थ त्रस्त : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार   

Next

मुरुड : तालुक्यातील विहूर धरणातून मजगाव,उसरोली, नांदगाव, विहूर अशा चार ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सुमारे ३६ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येला या धरणातून पाणीपुरवठा होत असतो. एकमेव व अतिशय महत्त्वाचे असे धरण आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून या धरणातून दुर्गंधीयुक्त व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे या पाण्यामुळे असंख्य ग्रामस्थ त्रस्त झाले होते.

या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी.वेंगुर्लेकर उपस्थित होते.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी विहूर धरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना पाठवून परिस्थितीचे अवलोकन करावे, विहूर धरणातून दुर्गंधीयुक्त पाणी येते का याचा तपास करावा, या समस्या कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी नवीन अंदाज पत्रक बनवून आवश्यक त्याबाबी पूर्ण करून घ्याव्यात, पुन्हा अशी समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश यावेळी त्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील यांनी विहूर धरणातून मुख्य पुरवठा करणारी वाहिनी लोखंडी टाकण्यात  आली आहे. याशिवाय ज्या पाइपलाइनमधून धरणाच्या पाण्याचा पुरवठा होतो, तिथे कचरा अडकू नये, यासाठी जाळी बसवणे आवश्यक होते, परंतु असे न केल्यामुळे पाइपलाइनमध्ये कचरा अडकून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. दोन वॉश आउट घेऊनही पाणी तसेच येत आहे. या ग्रामपंचायतींना पाण्याचा कोणताही स्रोत नाही. यासाठी विहूर धरणाची समस्या सोडवून द्यावी, अशी विनंती केली.
 उसरोली सरपंच मनीष नांदगावक यांनी, सध्या ग्रामपंचायतीच्या साठवण पाण्याच्या टाकीत टी.सी.एल टाकून पाणीपुरवठा करीत आहेत, परंतु आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. तरी तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले.
   जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देण्यात आले. यावेळी उसरोली सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच महेश पाटील, मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील, सदस्य अमित कोळी, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अस्लम हलडे, सदस्य भाई सुर्वे, रमेश दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

उपायाची मागणी  
उसरोली सरपंच मनीष नांदगावक यांनी, सध्या ग्रामपंचायतीच्या साठवण पाण्याच्या टाकीत टी.सी.एल टाकून पाणीपुरवठा करीत आहेत, परंतु आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. एकमेव हेच धरण चार ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारे आहे, तरी तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले. या समस्येकडे ल देण्याची मागणी केली आहे. 

पाणीसमस्या सोडवण्यासाठी मी आपल्यासोबत असणार आहे. ग्रामपंचायतीमधील लोकांना शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद आपल्यासोबत आहे.
-योगिता पारधी, 
अध्यक्षा, जिल्हा परिषद 
 

Web Title: Contaminated water supply from Vihur dam, villagers suffer: Complaint to Zilla Parishad President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड