शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अनधिकृत झोपड्यांवर सिडकोची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:13 IST

झोपड्या हटवण्याची सुरक्षा यंत्रणेची होती मागणी

उरण : चारफाटा येथे मागील ३० वर्षांपासून अनधिकृतरीत्या वसविण्यात आलेल्या शेकडो झोपड्या सिडकोने पोलीस बंदोबस्तात बुधवारी जमीनदोस्त केल्या. यावेळी पोलिसांनी शेकाप कार्यकर्ते आणि झोपडीधारकांच्या कडव्या विरोधाला जुमानले नाही. उलट, विरोध करणाऱ्या शेकाप कार्यकर्त्यांसह अनेक झोपडपट्टीवासीयांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.उरण चारफाटा-ओएनजीसी मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झोपडपट्ट्या वसल्या आहेत. ओएनजीसीसह इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू पाहणाºया या झोपड्या हटविण्याची मागणी ओएनजीसीसह सुरक्षा यंत्रणेकडूनही सातत्याने केली जात होती. मात्र, ३० वर्षांपासून अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्यांना राजाश्रय मिळाल्याने झोपड्यांवर कारवाई करण्यात अडचणी येत होत्या.अखेर बुधवारी (१२) उरण-चारफाटा येथील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहायक पोलीस उपायुक्त विठ्ठल दामगुडे, उरण वपोनि निवृत्ती कोल्हटकर, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वपोनि चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी जमा होताच शेकाप कार्यकर्त्यांसह झोपडवासीयांनीही अडथळे निर्माण करीत सिडकोच्या कारवाईस जोरदार विरोध केला. शेकाप कार्यकर्ते आणि झोपडीवासीयांनी सिडको-पोलिसांविरोधात निषेधाच्या जोरदार घोषणाही दिल्या.सिडको-पोलीस यांच्याशी शेकाप पदाधिकारी आणि झोपडपट्टीवासीयांनी कारवाई थांबविण्यासाठी ४८ तासांची मुदतही मागितली.सिडको आणि पोलिसांनी याआधीच अनेक वेळा मुदतवाढ दिली होती.चार महिन्यांपूर्वीही आठ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. मात्र, आता चार महिन्यानंतरही कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत कारवाई करण्यास सुरुवात केली.अडथळा आणण्याचा प्रयत्न झालाया कारवाईच्या विरोधात शेकाप आणि झोपडपट्टीवासीयांनी अडथळा आणण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, शेकाप-झोपडपट्टीधारकांच्या विरोधाला न जुमानता सिडकोने चारफाटा येथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्या बुलडोझर लावून जमीनदोस्त केल्या. या दरम्यान विरोध करणाºया शेकाप कार्यकर्त्यांसह अनेक झोपडपट्टीवासीयांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.

टॅग्स :cidcoसिडको