शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

चिल्हे- देवकान्हे रस्ता उखडला

By admin | Updated: April 22, 2017 02:43 IST

रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या रोहे तालुक्यातील खांब-पालदाड मार्गाअंतर्गत येणाऱ्या चिल्हे ते देवकान्हे या अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून

रोहा : रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या रोहे तालुक्यातील खांब-पालदाड मार्गाअंतर्गत येणाऱ्या चिल्हे ते देवकान्हे या अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून हा रस्ता उखडला आहे. यामुळे येथील अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.खांब-पालदाड मार्गावरून दररोज शेकडोच्या संख्येने वाहने ये-जा करीत असतात त्यामुळे या मार्गावर नेहमीच रहदारी आढळून येते. मागील ८-१० वर्षांपूर्वी मार्गाचे पक्के डांबरीकरण केल्यानंतर पुढील कालावधीत या मार्गाच्या डागडुजी व दुरुस्तीकडे संबंधितांकडून वेळोवेळी लक्ष न पुरविल्याने या मार्गाच्या दुरवस्थेत भर पडत गेली. तर गतवर्षी विधान परिषद आ.सुनील तटकरे व आ.अनिल तटकरे यांनी लक्ष पुरविल्याने खांब ते चिल्हे व या वर्षी देवकान्हे ते बाहे या टप्प्याचे पक्के डांबरीकरण व कारपेटचे काम पूर्णत्वास नेल्याने प्रवासी व रहिवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तर सद्यस्थितीत चिल्हे ते देवकान्हे व बाहे ते उडदवणे हा मार्ग प्रचंड उखडल्याने प्रवासाच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यापूर्वी या अंतर्गत मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष पुरविले नाही तर प्रवास करणे फार मोठे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात कसरत करावी लागेल.खांब ते पालदाड मार्गावर दररोज मोठ्या संख्येने प्रवासी वाहने, कंपनी कामगार, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, किरकोळ विक्रे ते, शेतकरीवर्ग ये -जा करीत असतात. परंतु मुख्य प्रवासाचा रस्ताच खड्डेमय झाल्याने साऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे निदान पावसाळ्यापूर्वी तरी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन आमची जाचातून सुटका व्हावी अशाप्रकारची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)