शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी आज बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 03:14 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

अलिबाग : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्येही बंद पाळण्यात येणार असल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प होणार आहेत.ठाणे आणि नवी मुंबईमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याने तो विभाग वगळता राज्यात सर्वत्र बंद यशस्वी करण्यावर भर देण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी पाठबळ दिले असतानाच महाराष्ट्र राज्य मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीनेही पाठिंबा दिलाआहे.मराठा क्रांती मोर्चाने याआधी काढलेले सर्व मोर्चे शांततेत काढले होते. त्या वेळी कोणतेही गालबोट त्या आंदोलनाला लागलेले नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मोर्चाला हिंसक वळण लागल्याने जाळपोळसारख्या घटना घडल्या होत्या. आंदोलक हिंसक झाल्याने त्यांची पोलिसांबरोबर भिडत झाली होती. या आंदोलनादरम्यान एका युवकाचाही मृत्यू झालाआहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध ठिकाणी आत्महत्या करून जीवन संपवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढे होत असताना सरकार मात्र आंदोलकांच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने वेळोवेळी केला आहे.सातत्याने मागणी करूनही सरकार मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसत असल्याची धारणा आंदोलकांची झाली आहे. सरकारला वठणीवर आणण्यासाठी ठोक आंदोलनाची भाषा आता आंदोलकांनी केल्याने आगामी काळातील मोर्चाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे, असे असतानाही आंदोलक आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटण्याच्या मन:स्थितीमध्ये नसल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते.राज्यात यापुढे मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठामधील काही संघटनांनी महाराष्ट्र बंदमधून माघार घ्यायचा निर्णय घेतला. परंतु आरक्षणासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्याचे काय, असा प्रश्न संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुधीर भोसले यांनी उपस्थित केला आहे.गुरुवारचे आंदोलन शांततेत करण्यात येणार आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात होणारे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विविध व्यापारी असोसिएशन, कापड विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, विविध खासगी आस्थापनांना रायगड बंद करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.>रायगड बंदचा परिणामरायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वडखळ येथे तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे (जुना महामार्ग) या ठिकाणी आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खालापूर, खोपोली, कर्जत, पनवेल, उरण येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहेत, तर माणगाव, महाड येथे रास्ता रोको होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चा गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नशील आहे, परंतु सरकारने अद्यापही दखल घेतलेली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असल्याने त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र राज्य मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे सल्लागार इम्तीयाज पालकर यांनी सांगितले. पाठिंबा देण्याचे पत्रच त्यांनी दिले असल्याचे सांगितले.>गुरु वारच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाड शहरामध्ये बुधवारी पोलिसांनी संध्याकाळी संचलन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे पोळ, पोलीस निरीक्षक शैलेश सणस, उपनिरीक्षक पंकज गिरी आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महाड बाजारपेठ व शहरातील प्रमुख मार्गावर हे पोलीस संचलन करण्यात आले.

टॅग्स :RaigadरायगडMaratha Reservationमराठा आरक्षण