बुलडाण्याच्या पर्यटकाचा रायगडावर हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 06:34 IST2018-12-26T06:33:47+5:302018-12-26T06:34:21+5:30

रायगड किल्ला चढताना हृदयविकाराच्या झटक्याने एका पर्यटकाचा मृत्यू झाला.

 Buldhana tourists die from heart attack on Raigad | बुलडाण्याच्या पर्यटकाचा रायगडावर हृदयविकाराने मृत्यू

बुलडाण्याच्या पर्यटकाचा रायगडावर हृदयविकाराने मृत्यू

दासगाव : रायगड किल्ला चढताना हृदयविकाराच्या झटक्याने एका पर्यटकाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. त्यांना पाचाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
दत्तात्रेय रामराव परिहार (३८, रा. बुलडाणा, चिखली) असे मृत पर्यटकाचे नाव असून, चिखली येथील अनुराधा इंग्रजी माध्यमिक शाळेत ते उपमुख्याध्यापक होते. या शाळेतील १० शिक्षक, मुख्याध्यापकांसह सोमवारी सुटीनिमित्त ते रायगड पाहण्यासाठी आले होते. महाड येथे वस्ती करून सकाळी सर्व जण गड पायी चढत होते. वाटेत सर्वांनी फोटोही काढले. त्यानंतर परिहार यांना दम लागला, परंतु तरीही ते चालत राहिले. साधारण ९.३० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूच्या धक्क्याने सोबत आलेल्या दोघांनाही दवाखान्यात दाखल करावे लागले.

Web Title:  Buldhana tourists die from heart attack on Raigad