शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर कृषी अधिकारी सुरेश खेडकर अटकेत

By admin | Updated: August 27, 2015 23:10 IST

तालुक्यातील पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करताना, ठेकेदाराचे बिल अदा करताना कर्जत तालुक्याचे कृषी अधिकारी आणि तीन कृषी पर्यवेक्षक यांनी ठेकेदाराकडे लाच मागितली होती.

कर्जत : तालुक्यातील पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करताना, ठेकेदाराचे बिल अदा करताना कर्जत तालुक्याचे कृषी अधिकारी आणि तीन कृषी पर्यवेक्षक यांनी ठेकेदाराकडे लाच मागितली होती. याप्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साडेतीन लाखांची लाच घेताना तीन कृषी पर्यवेक्षकांना रंगेहाथ पकडले. मात्र कर्जत तालुका कृषी अधिकारी सुरेश खेडकर फरार झाला होता, अखेर एका महिन्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. त्याला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुणे येथून कर्जतमध्ये कृषी विभागात नोकरीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी पाणलोटची कामे करण्यासाठी पुणे येथील शिवा लालू पवार या ठेकेदाराची नेमणूक केली होती. ठेकेदाराने कर्जत तालुक्याच्या कशेळे विभागामध्ये वर्षभरात ५० लाख रु पयांची कामे केली होती. त्यातील २१ लाख रु पयांच्या धनादेशामधील ९ लाख रु पये ठेकेदार शिवा पवार यास परत करण्याची तयारी दर्शवून सर्व रक्कम या कार्यालयातील लोकसेवकांनी कमिशन (लाच) म्हणून मागणी केली होती.यामध्ये कृषी अधिकारी सुरेश खेडकर, सहायक कृषी अधिकारी रावसाहेब आंधळे, कृषी पर्यवेक्षक संदीप जाधव, नंदकुमार पवार यांचा समावेश होता. याबाबत ठेकेदार शिवा पवार (४५, रा. पुणे) यांनी रायगड लाचलुचपत विभागाकडे धाव घेवून तक्र ार केली होती. त्यानंतर २३ जुलैला रायगड लाचलुचपत विभागाच्या महिला पोलीस निरीक्षक इनामदार यांनी ठेकेदाराकडून लाच घेताना कृषी विभागातील तीन अधिकाऱ्यांना पकडले होते. (वार्ताहर)फरार अधिकारी : या प्रकरणातील तालुका कृषी अधिकारी सुरेश खेडकर हा फरार झाला होता. पुणे येथे राहत असलेला खेडकर हा पोलिसांना चकवा देता होता. अखेर एक महिन्याच्या प्रयत्नानंतर पोलिसांना लाचखोर कर्जत तालुका कृषी अधिकाऱ्याला पकडण्यात यश आले. त्याला जिल्हा न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.