कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू
By वैभव गायकर | Updated: May 5, 2025 06:04 IST2025-05-05T06:02:52+5:302025-05-05T06:04:23+5:30
जखमींना पनवेल मधील एमजीएम व गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू
वैभव गायकर
लोकमत न्युज नेटवर्क
पनवेल :मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड येथे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बोरिवली वरून सावंतवाडी ला जाणारी खाजगी बस नंबर एमएच 47, वाय 7487 ही पलटी होऊन अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. या घटनेत 30 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.व दोन जण मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
जखमींना पनवेल मधील एमजीएम व गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले.अपघात स्थळी पनवेल महानगरपालिका व कळंबोली फायर यांचे रेस्क्यू टीम ॲम्बुलन्स व क्रेन घटनास्थळी पोचले होते.सदर अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.
#WATCH | Maharashtra | Several feared injured after a bus overturned on the Mumbai-Goa highway near Karnala, Raigad district. More details awaited. pic.twitter.com/3AfVBjoZjC
— ANI (@ANI) May 4, 2025
यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडवली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.कर्नाळा खंडित वारंवार अपघात होत असतात.नागमोडी वळणावर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना अर्धवट ठरत आहेत.