नेरळ : कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून सुमारे नऊ लाख रु पयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामनिधीतून सुनिता चव्हाण यांच्या घरापासून ते पेशवाई रोडपर्यंत सिमेंट काँक्र ीट रस्ता व गटार करणे यासाठी २ लाख ९९ हजार, भोलेनाथ स्टोअर्स ते प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ रस्ता पेवर ब्लॉक करणे २ लाख ९९ हजार, धामोते येथे सार्वजनिक शौचालये बांधणे २ लाख ९९ हजार अशी अनेक कामे करण्यात येणार आहेत. या भूमिपूजनप्रसंगी सरपंच शेवंतीबाई वळवे, उपसरपंच राजन विरले, ग्रामपंचायत सदस्य विलास हजारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस विजय हजारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}