Attempted to kill by shooting out of anger at the breakup of the marriage | लग्न मोडल्याच्या रागातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

लग्न मोडल्याच्या रागातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

महाड : लग्न मोडल्याच्या रागातून मुलाच्या भावाला गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना महाड तालुका पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी पाचाड निजामपूर मार्गावर ही घटना घडली.

अलिबाग तालुक्यातील बोपोली येथील दीपक बोडेकर यांच्या भावाचे लग्न नेराव येथील संतोष कोकरे यांच्या मुलीबरोबर ठरले होते.  लग्न मोडून दीपक बोडेकर आणि त्यांचा साथीदार पाचाड निजामपूर मार्गाने अलिबागकडे परत जात असताना संतोष कोकरे आणि त्यांचा साथीदार धनाजी खरात यांनी रस्त्यात अडवून त्या दोघांना बेदम मारहाण केली आणि दीपक बोडेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. ही गोळी जमिनीवर पडली.

Web Title: Attempted to kill by shooting out of anger at the breakup of the marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.