तटकरेंना गेल्या निवडणुकीत केलेली मदत ही घोडचूक; ‘शेकाप’च्या जयंत पाटील यांची कबुली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 12:12 IST2024-04-14T12:11:48+5:302024-04-14T12:12:43+5:30

इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंवाद दौऱ्यानिमित्त अलिबाग सभा आयोजित केली होती.

Assistance given to Tatkars in the last election was a mistake Confession of Jayant Patil of 'Shekap' | तटकरेंना गेल्या निवडणुकीत केलेली मदत ही घोडचूक; ‘शेकाप’च्या जयंत पाटील यांची कबुली  

तटकरेंना गेल्या निवडणुकीत केलेली मदत ही घोडचूक; ‘शेकाप’च्या जयंत पाटील यांची कबुली  

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार मधुकर ठाकूर आणि माजी आमदार माणिक जगताप यांची मनधरणी करून त्यांना सुनील तटकरेंचा प्रचार करण्यास भाग पाडले होते. मात्र, ही मोठी घोडचूक माझ्याकडून झाली, अशी कबुली शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी दिली. इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंवाद दौऱ्यानिमित्त अलिबाग सभा आयोजित केली होती.

यावेळी ते बोलत होते. अनंत गीते, माजी आमदार पंडित पाटील, विधान परिषद प्रमुख किशोर जैन, काँग्रेस प्रदेश सचिव ॲड. प्रवीण ठाकूर, महिला काँग्रेस अध्यक्ष ॲड. श्रद्धा ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते. गेल्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर तटकरे यांनी आम्हाला  टाटा केला. मात्र, यावेळी ही चूक सुधारली आहे, असेही  पाटील यांनी सांगितले.‘आरएसएस’चा एक गट हा मोदींच्या विरोधात आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपला देशात १७० जागा मिळतील, असे समोर आले असल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: Assistance given to Tatkars in the last election was a mistake Confession of Jayant Patil of 'Shekap'