भाजप नगरसेवकावरील राग, दारूच्या नशेत शेकापच्या नगरसेवकाचा खोपोलीत गोळीबार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:51 IST2021-03-17T07:50:39+5:302021-03-17T07:51:10+5:30

खोपोली शहरातील शेकापचे नगरसेवक प्रशांत कोठावळे हे आपल्या सहकारी नगरसेवकाच्या पुतण्याच्या हळदी कार्यक्रमाला रविवारी गेले असताना या ठिकाणी एका व्यक्ती बरोबर किरकोळ वाद झाला होता.

Anger over BJP corporator, drunken corporator Firing in Khopoli | भाजप नगरसेवकावरील राग, दारूच्या नशेत शेकापच्या नगरसेवकाचा खोपोलीत गोळीबार  

भाजप नगरसेवकावरील राग, दारूच्या नशेत शेकापच्या नगरसेवकाचा खोपोलीत गोळीबार  

वावोशी : खोपोली शहरातील शेकापच्या नगरसेवकाने मद्यपानाच्या नशेत भाजप नगरसेवकावरील राग मनात धरून रविवारी मध्यरात्री दीड वाजता काही मंडळींना घेऊन धिंगाणा घालत हवेत गोळीबार केला असून आरोपी नगरसेवक मात्र फरार झाला आहे.

खोपोली शहरातील शेकापचे नगरसेवक प्रशांत कोठावळे हे आपल्या सहकारी नगरसेवकाच्या पुतण्याच्या हळदी कार्यक्रमाला रविवारी गेले असताना या ठिकाणी एका व्यक्ती बरोबर किरकोळ वाद झाला होता. त्याठिकाणी मध्यस्ती करून वाद मिटविण्यासाठी भाजपाचे नगरसेवक तुकाराम साबळे यांनी पुढाकार घेतला होता, त्याचा मनात राग धरून शेकापचे नगरसेवक प्रशांत कोठावळे यांनी रविवारी मध्यरात्री दीड वाजता आपल्याकडील काही मंडळींना बरोबर घेऊन भाजपाचे नगरसेवक तुकाराम साबळे यांच्या घरासमोर जाऊन धिंगाणा घालून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याने खोपोली शहरात खळबळ उडाली.  या घटनेचा पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर तपास करीत आहेत.
 

Web Title: Anger over BJP corporator, drunken corporator Firing in Khopoli