शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आंत्रड तर्फे वरेडी येथील अंगणवाडी झाली खुली , ग्रामस्थ समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 3:43 AM

अंगणवाडी सेविकेला अतिरिक्त भार दिल्याने ती अंगणवाडीत येत नव्हती, यामुळे अतिरिक्त भार पडल्याने मदतनीस आजारी पडल्याने ९० बालके एवढी पटसंख्या असलेली आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडीला कुलूप लागले होते.

- कांता हाबळेनेरळ - अंगणवाडी सेविकेला अतिरिक्त भार दिल्याने ती अंगणवाडीत येत नव्हती, यामुळे अतिरिक्त भार पडल्याने मदतनीस आजारी पडल्याने ९० बालके एवढी पटसंख्या असलेली आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडीला कुलूप लागले होते. तर या सगळ्याकडे एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग कर्जत बघ्याची भूमिका घेत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच याची दखल घेत एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने ही अंगणवाडी तत्काळ खुली केली आहे.कर्जत तालुक्यातील आंत्रड तर्फे वरेडी या गावातील अंगणवाडीत सुमारे ९० बालके एवढी पटसंख्या आहे. तर १० महिलांचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत समावेश आहे. जुलै २०१८ मध्ये येथील अंगणवाडी सेविका शकुंतला डायरे या सेवानिवृत्त झाल्या, म्हणून त्या रिक्त जागेवर भारती खडे यांना अतिरिक्त भार देण्यात आला. या अंगणवाडी केंद्रावर गेल्या सहा वर्षांपासून कांचन डायरे या मदतनीस म्हणून काम पाहत आहेत. नियुक्ती झाल्यापासून खडे या अंगणवाडी केंद्रात वेळेत येत नाही व भरपूर दिवस त्या केंद्रात येतच नसल्याने कांचन डायरे यांच्यावर अतिरिक्त भर पडत होता. या अतिरिक्त भारामुळे कांचन डायरे या आजारी पडल्या. परिणामी, गेल्या आठ दिवसांपासून आंत्रड तर्फे वरेडी येथील अंगणवाडीला कुलूप लागले होते.अंगणवाडी बंद असल्यामुळे येथील बालकांचे तर हाल झालेच आहेत; पण सोबत गावातील दहा महिलांचा अमृत आहारदेखील बंद झाला होता. दरम्यान, या सगळ्यात संबंधित प्रकरणाची माहिती असूनदेखील एकात्मिक बालविकास प्रकल्प कर्जतने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाला खडबडून जाग आली आहे. या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पुरी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डी. पी. वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे, सी.ए.एन. प्रतिनिधी अशोक जंगले यांनी आंत्रड अंगणवाडीला भेट दिली. खडे या अंगणवाडी सेविकेच्या जागी शेजारील गावातील काळेवाडी येथील अंगणवाडी सेविकेला येथील चार्ज देण्यात येऊन अंगणवाडी बालकांसाठी खुली केली आहे.केवळ ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली म्हणून ही अंगणवाडी पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. बालकांना पोषण आहाराविना इतके दिवस वंचित राहावे लागले होते. आमच्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल आम्ही आंत्रड गावकरी आभारी आहोत.- रवींद्र डायरे,सामाजिक कार्यकर्ते, आंत्रड

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई