शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श ग्रामला ‘सीएसआर’चे बळ

By admin | Updated: August 28, 2015 23:19 IST

स्वच्छ भारत अभियानाची सांगड संसद आदर्श ग्राम योजनेत घालण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात उत्कृष्ट

- आविष्कार देसाई,  अलिबागस्वच्छ भारत अभियानाची सांगड संसद आदर्श ग्राम योजनेत घालण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात उत्कृष्ट दर्जाची वैयक्तिक शौचालये उभारण्यासाठी जेएसडब्लू इस्पात कंपनी सीएसआर फंडातून १५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ उभे करणार आहे. त्यामुळे दिवेआगर हागणदारीमुक्त होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यावे अशी अपेक्षा केली आहे. त्यांच्याच संकल्पनेतून संसद आदर्श ग्राम योजना जन्माला आली आहे. या योजनेंतर्गत संबंधित गावात आवश्यक ती सर्व विकासकामे करता येणार आहेत. खासदारांना तेथे विकासकामे करताना विशेष निधीही दिला जाणार आहे. अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाचा समावेश संसद ग्राम योजनेत केला असून गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला दिवेआगरमध्ये एकूण १२२ वैयक्तिक शौचालये उभारायची आहेत. पैकी ३९ शौचालये बांधून पूर्ण झाली असून ८३ शौचालये बांधणे अद्यापही बाकी आहेत. जेएसडब्लू इस्पात कंपनी चांगल्या प्रतीची ६३ शौचालये बांधून देण्यास तयार झाली आहे. यासाठी लागणारा १५ लाख रुपयांचा निधी कंपनी त्यांच्या सीएसआर फंडातून खर्च करणार आहे. याबाबतची बैठक नुकतीच कंपनीमध्ये पार पडली. (वार्ताहर)८३ स्वच्छतागृहेअनंत गीते यांनी दिवेआगरमध्ये विकासकामांचे नुकतेच भूमिपूजन केले आहे. त्यांना कंपनीचा सीएसआर फंड विधायक कामासाठी खर्च करण्यात कोणतीच अडचण येणार नसल्याने कंपनीही त्यांना सढळ हस्ते मदत करणार यात शंका घेण्याचे कारण नाही. कंपनीकडून एकूण ८३ स्वच्छतागृहे बांधून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे रायगड समन्वयक जयवंत गायकवाड यांनी सांगितले.