शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

ड्रंक अ‍ँण्ड ड्राईव्हअंतर्गत कारवाई

By admin | Updated: April 20, 2017 03:48 IST

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला भाग असून या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे.

मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला भाग असून या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. सध्या तरु ण पिढीचे आकर्षण ठरणारी विविध कंपन्यांनी काढलेली मॉडलेट वाहन खरेदी करण्याकडे येथील तरुण पिढीचा कल दिसून येत आहे. परिसरातील रस्त्याअंतर्गत असलेली मद्याची दुकाने बंद असतानाही वाहनचालक मद्य प्राशन करून वाहने चालवित असल्याने त्यांच्यावर जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई करण्यास सुरु वात केली आहे.जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रायसिंग वसावे, पोलीस हवालदार संदीप पाटील, अजय आव्हाड यांनी ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत धडक कारवाईची मोहीम सुरू केल्याने मद्य पिवून वाहन चालविणाऱ्यांचे व तळीरामांचे धाबे दणाणले आहेत. रसायनीत वाहतूक पोलिसांनी विनापरवाना व धूमस्टाईलने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने बेदरकार वाहन चालविणाऱ्यांना जरब बसणार आहे. रसायनी वाहतूक शाखेच्या प्रयत्नाने अतिवेगात वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तसेच दंडात्मक कारवाई करून त्यांना ब्रेक लावण्याचा वाहतूक पोलीस प्रयत्न करीत आहेत. दोनपेक्षा जास्त व्यक्ती दुचाकीवर बसणे, नंबर प्लेट नसणे, परवानगीशिवाय इतर साहित्याची वाहतूक करणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही कठोर कारवाई सुरू असून वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे टाळावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, नो पार्किंग क्षेत्रात वाहने थांबवू नयेत, रात्रीच्या वेळी वाहन थांबविताना पार्किंग लाइट लावावे, धोकादायक ओव्हरटेक करू नये, अवैध वाहतूक केल्यास व अतिवेगाने वाहन चालविल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा रसायनीतील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिला.