शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

वासांबे स्वच्छता समितीची कारवाई; प्लास्टिक पिशव्या पुरवणारी रिक्षा पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:27 PM

दंडात्मक रक्कम गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द

मोहोपाडा : वासांबे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता समितीने मोहोपाडा बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्या वापरणाºया दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परिसरात प्लास्टिक पिशव्या पुरविणारी रिक्षा पकडून त्यातील जवळपास ७० किलो वजनी प्लास्टिक पिशव्या जप्त करत दुकानदारांवर दंडात्मक कारवाई के ली. रोख रक्कम गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे सुपूर्द केली.

शासनाने ५० मायक्रानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे, यामुळे मोहोपाडा शहरातील दुकानात प्लास्टिक पिशव्या बंदीविरोधात ठोस पावले उचलण्यात आली. या वेळी दुकानदार, फेरीवाल्यांकडून पिशव्या जप्त करण्यात आल्या.या आधी ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाईही केली होती. सद्यस्थितीला प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीबाबत विसर पडला असून, दुकानदार व फेरीवाल्यांना कोणाचीच भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे, याकरिता वासांबे स्वच्छता समितीचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी मोहोपाडा बाजारपेठेतील दुकानदारांकडून आणि फेरीवाल्यांकडून शेकडो किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाईही केली. तरीही अनधिकृत फेरीवाल्यांकडून ग्राहकांना पातळ पिशव्या दिल्या जात असल्याचे वासांबे स्वच्छता समितीच्या लक्षात आले. त्यांनी दुकानदारांना प्लास्टिक पिशव्या पुरविणाºयाला पकडण्यासाठी सापळा लावला. रिक्षा क्रमांक एम एच-४६, एझेड-७८६१ ही रिक्षा पकडून त्यातील जवळपास ७० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. ही कारवाई स्वच्छता समितीचे अध्यक्ष अरुण गायकवाड, रेश्मा भगत, विवेक ओक, सुप्रिया गायकर, मिलिंद कावडे आदीनी केली. शिवाय बाजारपेठेतील दुकानदारांकडून रोख १३ हजार दंडही वसूल केला.१३ हजार रु पये दंड वसूलअरुण गायकवाड म्हणाले की, परिसरात प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासंबंधी जनजागृती करणे गरजेचे आहे. कारवाईत जवळपास ७० किलो प्लास्टिक पिशव्या व रोख १३ हजार खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय भोये, विस्तार अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी संजय बडे व सरपंच ताई पवार यांच्याकडे सुपूर्द केले. वासांबे स्वच्छता समितीने चांगला उपक्रम राबविला असून त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे गटविकास अधिकारी संजय भोये यांनी सांगितले.