Raigad News : रेवदंडा-रोहा रस्त्यावर अपघात, ट्रक चालकाने आठ जणांना उडवले, तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 20:34 IST2021-03-31T20:33:53+5:302021-03-31T20:34:22+5:30
Accident on Revdanda-Roha road : जखमींवर रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Raigad News : रेवदंडा-रोहा रस्त्यावर अपघात, ट्रक चालकाने आठ जणांना उडवले, तिघांचा मृत्यू
ठळक मुद्देसदरचा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.
रोहा / धाटाव : रेवदंडा-रोहा मार्गावर ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना घडली. त्यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंततर त्याला रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले. सदरचा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अपघाताची नोंद घेण्याचे काम रोहा आणि रेवदंडा पोलिस ठाण्यात सुरु आहे.