Accident: कंटेनर, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 03:15 AM2022-09-02T03:15:51+5:302022-09-02T03:16:13+5:30

Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि.१) पहाटे ट्रक आणि कंटेनरची जोरादार धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident: One killed, two injured in collision with container, tempo, accident on Mumbai-Goa highway | Accident: कंटेनर, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात

Accident: कंटेनर, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात

Next

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि.१) पहाटे ट्रक आणि कंटेनरची जोरादार धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगावाच्या हद्दीत मुंबईहून गोव्याकडे जाणारा कंटेेनर महाडकडून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोवर विरुद्ध दिशेला येऊन आपटला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्या समोरून एकामेकांमध्ये घुसल्या. या धडकेत टेम्पोचालक अशोक गोविंद बारगीर (रा. दासगाव, महाड) याचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोमधील प्रवासी महफुज मजिदुल्ला खान (रा. नागलवाडी, महाड) आणि कंटेनरचालक दिनेश कुमार बीजनाथ यादव (रा. बिहार) हे दोघे गंभीर जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. पी. खोपडे, महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाडचे पोलीस हवालदार मंदार लहाने सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर दीड तास कंटेनरचालक वाहनातच अडकला होता. अथक प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढले.

Web Title: Accident: One killed, two injured in collision with container, tempo, accident on Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.