सरावावेळी फेकलेला भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू; माणगावमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 07:34 IST2023-09-07T07:31:17+5:302023-09-07T07:34:35+5:30

पुरार येथील आयएनटी स्कूलमध्ये तालुका क्रीडा स्पर्धा सुरू आहेत.

A student died after a thrown javelin entered his head during practice in mangaon raigad | सरावावेळी फेकलेला भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू; माणगावमधील धक्कादायक घटना

सरावावेळी फेकलेला भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू; माणगावमधील धक्कादायक घटना

माणगाव (रायगड) : शाळेत तालुका क्रीडा स्पर्धेचा सराव सुरू असताना फेकलेला भाला एका विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. हुझेफा कुतुबुद्दीन डावरे (वय १५, रा. दहीवली कोंड), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आयएनटी स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता.

गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरार येथील आयएनटी स्कूलमध्ये तालुका क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेचा भालाफेकीचा सराव सुरू असताना हुझेफा डावरे सराव बघत होता. यावेळी तो काही क्षणासाठी वाकला असता फेकलेला भाला डाव्या कानशिलाच्या वर मेंदूमध्ये घुसला. त्यानंतर त्याला गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात केली आहे.

Web Title: A student died after a thrown javelin entered his head during practice in mangaon raigad