श्रीवर्धन तालुक्यात ९० टक्के मदत वाटप; ३२ कोटी ४५ लाख निधी प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:50 AM2020-07-13T00:50:37+5:302020-07-13T00:51:23+5:30

वादळाने तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांच्या भिंती पडलेल्या आहेत, घरावरची कौले व पत्रे पूर्णपणे फुटलेली आहेत. अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

90% aid distribution in Shrivardhan taluka; 32 crore 45 lakh funds received | श्रीवर्धन तालुक्यात ९० टक्के मदत वाटप; ३२ कोटी ४५ लाख निधी प्राप्त

श्रीवर्धन तालुक्यात ९० टक्के मदत वाटप; ३२ कोटी ४५ लाख निधी प्राप्त

googlenewsNext

श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, व्यापारी ते नोकरदार सर्वांनाच चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले, हातातील उपजीविकेचे साधन नाहीसे झाले. अशा कठीण प्रसंगी सर्वसामान्यांना सावरण्यासाठी सरकारकडून पंचनाम्यानुसार मदतनिधीचे वाटप करण्यात आले. तालुक्यात ३२ कोटी ४५ लाख रुपयांच्या मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे.
वादळाने तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांच्या भिंती पडलेल्या आहेत, घरावरची कौले व पत्रे पूर्णपणे फुटलेली आहेत. अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. घरांसाठी अंशत: मदतनिधी १५ हजार रु पये देण्यात आला आहे, तसेच पूर्ण घर पडले असेल, तर दीड लाख रुपये मदतनिधी देण्यात आली आहे. तालुक्यातील १९ हजार १३३ व्यक्तींना २६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ज्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला, अशा १०७ व्यक्तींना २३ लाख ८० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील क्षतिग्रस्त १२७ दुकानदारांना १० लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे, तसेच घरातील कपडे, धान्य आणि भांडी यांचे नुकसान झालेल्या ४,४८९ नागरिकांना तीन कोटी १७ लाख ६० हजार रुपये मदतनिधीची रक्कम देण्यात आलेली आहे. तालुक्यातील १९६ होड्यांच्या नुकसानीसाठी संबंधित व्यक्तींना आठ लाख ९६ हजार ६०० रुपये मदतनिधी देण्यात आलेला आहे, अशी माहिती प्राप्त झाली असून, ९० टक्के मदतनिधी वाटपाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित दहा टक्के काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे तहसीलदार सचिन गोसावी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना लवकर मिळणार भरपाई
मदतनिधीचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आलेला आहे. दुसºया टप्प्यामध्ये तालुक्यातील कृषी विभागाची मदतवाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या नारळ-सुपारीच्या बागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नारळ, सुपारी, केळी आणि आंबा या पिकांना वादळाचा फटका बसला आहे.
अनेक सातबारांवरती एकापेक्षा जास्त व्यक्तींची नावे असल्याने, मदतनिधी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सातबारावरील एका व्यक्तीकडून इतर व्यक्तींची ना हरकत घेतल्यानंतर मदतनिधी वाटपाचा मार्ग मोकळा होणार आहे. तालुक्यातील २,७३६ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे निदर्शनास येते आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्या प्रत्येक घटकापर्यंत शासनाचा मदतनिधी पाठविणे हे माझे दायित्व आहे. त्यानुसार, प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. लवकरच पूर्ण श्रीवर्धनमधील नुकसानग्रस्तांना मदतनिधीचे वाटप करण्यात येईल.
- सचिन गोसावी, तहसीलदार श्रीवर्धन

वादळानंतर असंख्य अडीअडचणींना सामोरे जात, महसूल, ग्रामविकास, शिक्षक, डेटा आॅपरेटर यांनी जनतेला मदतनिधी वाटप करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. बाधित प्रत्येक व्यक्तीपर्यंत मदतनिधी पाठविला जाईल, त्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
- अमित शेडगे, प्रांताधिकारी, श्रीवर्धन

माझ्या घराचा अंशत: मदतनिधी मला मिळालेला आहे. मात्र, नारळ-सुपारीचा मदतनिधी अद्याप मिळालेला नाही.
- उदय आवळस्कर,
नागरिक, श्रीवर्धन

माझे घर वादळात पडले आहे. मात्र, मला काहीच मदतनिधी मिळाला नाही.
- गुलाब निगुडकर, महिला, श्रीवर्धन

Web Title: 90% aid distribution in Shrivardhan taluka; 32 crore 45 lakh funds received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड