शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

८४ गावांना अशुद्ध पाणीपुरवठा

By admin | Updated: October 13, 2015 02:07 IST

शहरी भागात शुध्द पाणीपुरवठा होत असतानाच ग्रामीण परिसरातील जनतेवर अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे.

पेण : शहरी भागात शुध्द पाणीपुरवठा होत असतानाच ग्रामीण परिसरातील जनतेवर अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. पेणच्या खारेपाट विभागासह जीते, हमरापूर, दादर व खरोशी-पुरशेत या सर्वच विभागांना गेले तीन-चार महिने अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा हेटवणे धरणातून होत आहे. धरणातील विनाप्रक्रिया केलेले (रॉ वॉटर) पाणी आहे तसे पेणच्या रायगड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पुरवित आहे. तब्बल २९ ग्रामपंचायत क्षेत्रातील ८४ गावातील एक लाख लोकवस्तीमधील नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.पेणमध्ये हेटवणे धरणाचे पाणी येथील नागरिकांना पिण्याचा मुख्य स्रोत आहे. गेल्या जून महिन्यापासून या पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. मात्र मान्सून हंगामात छपरावरील पाणी गोळा करीत ते पिण्यासाठी वापरात आले. आता मान्सून संपल्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू लागली आहे. या समस्येचे निराकरण जलद गतीने व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य डी. बी. पाटील यांच्यासह २९ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी विभागवारी तक्रार अर्ज तहसीलदार पेण, गटविकास अधिकारी पेण व उपअभियंता ग्रामपंचायत पाणी पुरवठा डी. एन. खैरे यांना देवून देखील दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा थांबलेला नाही. हेटवणे धरणातून येणारे पाणी कच्चे अर्थात प्रक्रिया न केलेले असल्याने ते शुद्ध करणारी यंत्रणाच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे नाही. अधिकारी पाणी वितरण यंत्रणेत कुठे बिघाड आहे याकडे लक्ष देत नाहीत. हेच पाणी सिडको नेते. मात्र त्यांचा अद्ययावत असा फिल्टरप्लॉन्ट जिते येथे कार्यान्वित आहे. ज्या विभागावर पाणीपुरवठा करण्याचा भार आहे त्या यंत्रणेने गेल्या सात - आठ वर्षे या समस्येवर अभ्यास केला नाही. सिडको प्रकल्प संस्थेने पाण्याबाबतचा अहवाल सिडकोकडून मागितला आहे, असे कार्यकारी अभियंता गाडे यांनी सांगितले. हेटवणे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी वर्गाची संयुक्त बैठक घेवून समस्येवर उपाययोजना करत आली असती. मात्र अद्याप कोणतीह कारवाई झाली नाही. (वार्ताहर)