शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

म्हसळ्यातील ८ गावे २३ वाड्या टंचाईग्रस्त; शासनाची १८.६ लाखांची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 23:11 IST

मागील दोन-तीन वर्षांचा पाणीटंचाई कालावधीचा अनुभव, प्रत्यक्ष गाव-वाड्यांच्या भेटी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत घेऊन तालुक्याच्या पाणीटंचाई बाबत आराखडा करण्यात येतो.

म्हसळा : मागील दोन-तीन वर्षांचा पाणीटंचाई कालावधीचा अनुभव, प्रत्यक्ष गाव-वाड्यांच्या भेटी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत घेऊन तालुक्याच्या पाणीटंचाई बाबत आराखडा करण्यात येतो.यामध्ये आक्टोबर ते जून या कालावधीत येणारी संभाव्य पाणीटंचाई व कोणत्या पद्धतीने उपाययोजना करायच्या, तो आराखडा असतो. तालुक्यातील आठ गावे व २३ वाड्यांच्या टंचाई आराखड्यात समावेश करण्याचे समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड यांना कळविले आहे.सदर समितीत आमदार, सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता हे सदस्य आहेत. तालुक्यातील आठ गावे व २३ वाड्यांना टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने रुपये १८.६ लाखांची तरतूद केली आहे.टंचाई आराखडा करण्यापूर्वी टंचाईग्रस्त गावांच्या प्रगतिपथावरील योजना पूर्ण करणे, संबंधित योजनेला पूरक योजना करणे, योजनेची विशेष दुरुस्ती करणे, वापरात असणाऱ्या विंधण विहिरी दुरुस्त करणे, स्थानिक विहिरी अधिग्रहित करणे, असे विविध पर्याय वापरल्यानंतर संबंधित गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे समितीच्या माध्यमातून सुचविण्यात येते.आराखड्यातील गावे१) कुडगाव कोंड, २) गायरोणे, ३) तुरुंबाडी, ४ ) रोहिणी, ५) आडी ठाकूर, ६) घुम, ७) खारगाव (बु.), ८) खारगाव (खु.)वाड्या - १) चंदनवाडी (केलटे), २) सांगवड (ठाकरोली), ३) लेप गौळवाडी, ४ ) वाघाव बौद्धवाडी, ५) कृष्णनगर (खामगांव ), ६) बेटकरवाडी (पाभरे), ७) दगडघूम (निगडी), ८) निगडी मोहल्ला, ९) चिचोंडे (पाभरे), १०) सुरई (खारगाव बु.), ११) घाणेरी कोंड (कोळवट), १२) पानवे (केलटे), १३) आगरवाडा बौद्धवाडी, १४) आगरवाडा (आगरी वाडी), १५) तोराडी कुणबी वाडी, १६) तोराडी आदिवासी वाडी, १७) खामगाव गौळवाडी, १८) खामगाव सोनघर, १९) खामगाव मोहल्ला, २०) ताम्हणे शिर्के , २१) सकलप (खारगाव खु.), २२) तोंडसुरे जंगमवाडी, २३) जिजामाता हायस्कूल (वरवठणे)रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत विंधण विहीर कार्यक्रमाची परिपूर्ण पूर्तता झालीच नाही, तीच परिस्थिती म्हसळा तालुक्याची आहे. अनेक वेळा निधी वर्ग होत नाही, तर म्हसळ्यासारख्या दुर्गम तालुक्यात बोअरिंगचे मशीन पॉइंटवर मार्ग नसल्याने पोहोचत नाहीत ही मागील स्थिती आहे. तर बहुतांश गावांना मुुबलक निधी येऊनही सर्व ठिकाणी कामे सदोष झाल्याने तालुक्याला टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.- महादेव पाटील,माजी सभापती, पं.स. म्हसळा

टॅग्स :Raigadरायगड