शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 8:28 AM

बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली

खोपोली : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली. ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या बसमध्ये बसमध्ये 6 मुली व 40 मुले असल्याची माहिती आहे. बसमध्ये ६ मुली व ४० मुले होती. सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त झांज पथक ऑर्डर मिळाल्याने पिंपरी-चिंचवडला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर तेथून रात्री एकच्या ते मुंबईला परतत होते. यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.

घटनास्थळी मदतकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्यातील कार्यक्रम संपवून हे सर्वजण परत जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

या अपघातातील बस गोरेगावातील सुखकर्ता ट्रॅव्हल्सची व अपघातग्रस्त सतीश धुमाळ ढोल ताशा पथकातील कलाकार होते.

जखमींची नावे...1) नम्रता रघुनाथ गावणूक, 292) चंद्रकांत महादेव गुडेकर, 29 गोरेगाव.3) तुषार चंद्रकांत गावडे, 22 गोरेगाव.4) हर्ष अर्जुन फाळके, 19 गोरेगाव.5) महेश हिरामण म्हात्रे, 20 गोरेगाव.6) लवकुश रंजित कुमार प्रजाती, 16 गोरेगाव.7) आशिष विजय गुरव 19,  दहिसर.8) सनी ओमप्रकाश राघव, 21-  खालची खोपोली.9) यश अनंत सकपाळ, 19- गोरेगाव.10) वृषभ रवींद्र थोरवे, 14-गोरेगाव.11) शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव.12) जयेश तुकाराम नरळकर 24 कांदिवली.13) विशाल अशोक विश्वकर्मा, 23 कांदिवली.14) रुचिका सुनील धूमणे, 17 गोरेगाव.15) ओम मनीष कदम, 18 गोरेगाव.16) युसूफ उनेर खान, 14 गोरेगाव.17) अभिजित दत्तात्रय जोशी, 20 रत्नागिरी,18) कोमल बाळकृष्ण चिले, 15 मुंबई.19) हर्ष वीरेंद्र दुरी, 20 कांदिवली.20) ओमकार जितेंद्र पवार, 24 खोपोली, सोमजाई वाडी ळ.21) दिपक विश्वकर्मा, 21 कांदिवली.22) हर्षदा परदेशी23) वीर मांडवकर,24) मोहक दिलीप सालप, 18 मुंबई.

मयत..1) जुई सावंत, 15 गोरेगाव.

 

एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे 1)आशिष विजय गुरव,19 वर्षे, दहिसर मुंबई.2) यश अनंत सकपाळ, वय 17 वर्ष, गोरेगाव, मुंबई. 3) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई.4) वृषभ रवींद्र कोरमे, वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई. 5) रुचिका सुनील डुमणे, वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई.6) आशिष विजय गुरव, वय १९ वर्ष, दहिसर, मुंबई 7)ओंकार जितेंद्र पवार, वय 25 वर्षे खोपोली, रायगड.8) संकेत चौधरी, वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई. 9)रोशन शेलार, वय 35 वर्ष, मुंबई 10)विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई11) निखिल संजय पारकर, वय 18 वर्ष, मुंबई.12) युसुफ मुनीर खान, वय 13 वर्ष, मुंबई 13) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई14) अभिजीत दत्तात्रेय जोशी वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई.16) मोहक दिलीप सालप, वय 18 वर्षे, मुंबई.17) दिपक विश्वकर्मा, वय २०वर्ष, गोरेगाव, मुंबई18) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, वय १८ वर्ष, गोरेगाव,मुंबई.

खोपोली नगरपालिका हॉस्पिटल मधील जखमींची नावे१) नम्रत रघुनाथ गावनुक, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई.२) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई ३) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई४) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 वर्ष, विरार.५) महेश हिरामण म्हात्रे, वय २० वर्षे, गोरेगाव, मुंबई ६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई७) शुभम सुभाष गुडेकर, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई ८)ओम मनीष कदम, १८वर्ष, गोरेगाव, मुंबई.९) मुसेफ मोईन खान,वय २१ वर्ष, गोरेगाव, मुंबई

खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालय खोपोली जखमीची नावे:- १) सनी ओमप्रकाश राघव, वय २१ वर्ष, खोपोली,रायगड. 

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगडMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे