पेणजवळ एसटीचा अपघात, 22 प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 14:24 IST2018-07-10T14:19:14+5:302018-07-10T14:24:06+5:30
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला

पेणजवळ एसटीचा अपघात, 22 प्रवासी जखमी
पेण : पेणजवळील वरवणे येथे समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले असून एक प्रवासी गंभीर जखमी आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला.
पेणमधील वरवणे येथे समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नाच एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत असलेल्या एका शेतात घुसली. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व एसटी प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.