शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

२२ कोटींची कामे रखडली

By admin | Updated: August 8, 2015 22:08 IST

दुर्गम गावे मुख्य रस्त्यांशी जोडावी या उद्देशाने सुरू झालेली पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रायगड जिल्ह्यातील ९ रस्त्यांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे स्थानिक

महाड : दुर्गम गावे मुख्य रस्त्यांशी जोडावी या उद्देशाने सुरू झालेली पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रायगड जिल्ह्यातील ९ रस्त्यांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुरा निधी मिळाल्यामुळे या योजनेतील सुमारे २२ कोटी रु. पेक्षा अधिक कामे आज ठप्प झालेली आहेत. या योजनेच्या टप्पा दोनसाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१४ पासून निधीच उपलब्ध करून न दिल्यामुळे ठेकेदारांपुढे कामे पूर्ण कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. तर स्थानिक ग्रामस्थांनाही रस्त्याचे काम रखडल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात ही पंतप्रधान ग्रामसडक योजना केंद्र सरकारने सुरू केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे लोकसंख्येवरील मुख्य रस्त्याला न जोडलेली गावे जोडणे, त्यापाठोपाठ पाचशे ते एक हजार लोकसंख्या असलेली गावे मजबूत रस्त्यांनी जोडणे असा कार्यक्रम या योजनेत राबविण्यात आला. या योजनेचा फायदा अनेक गावांना झाला. त्यानंतर टप्पा दोन अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्याची कामे या योजनेत राबविण्यात आली. या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली रस्त्याची कामे समाधानकारक तसेच दर्जेदार असल्याचेही निदर्शनास आले. ही योजना नोव्हेंबर २०१४ पर्यंत व्यवस्थित सुरू होती. मात्र त्यानंतर या योजनेसाठी उर्वरित निधीच येणे बंद झाल्यामुळे या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.रायगड जिल्ह्यात निधीअभावी या योजनेतील नऊ कामे ठप्प झाली असून, आज ना उद्या या केलेल्या कामांना निधी येईल, या आशेवर ठेकेदारांनी सुमारे ७० ते ८० टक्के कामे केली आहेत. परंतु आता ठेकेदारांनीही हात टेकले आहेत. सुरुवातीला पाच ते पंचवीस लाख रुपयांचा निधी काम सुरू करण्यासाठी मिळाला. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने निधी देणेच बंद केल्याने ही कामे आज रखडली आहेत. यासाठी निधी मिळावा अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. (वार्ताहर)